🕒 1 min read
Team India : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आणि भारतीय संघातील महत्त्वाचा ऑलराऊंडर अक्षर पटेलने (Axar Patel) निवृत्ती घेतल्याची अफवा सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे. IPL 2025 च्या समाप्तीनंतर एक व्हिडिओ समोर आला, ज्यात अक्षर पटेल आपला क्रिकेट प्रवास संपल्याचे सांगताना दिसतो. “क्रिकेटने मला सर्व काही दिलं… पण प्रत्येक प्रवासाचा शेवट असतो,” असं तो या व्हिडिओत म्हणताना दिसतो.
“My cricket journey has come this far…”: Axar Patel
मात्र, या व्हिडिओचा तपास केल्यावर स्पष्ट झालं की, हा व्हिडिओ खोटा असून AI च्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे. अक्षर पटेलने स्वतः अशा कोणत्याही निवृत्तीची घोषणा केलेली नाही. ना त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे, ना BCCI ने त्याच्या निवृत्तीला दुजोरा दिला आहे.
IPL 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना अक्षरने पाचव्या स्थानापर्यंत संघाला पोहोचवलं. सध्या तो T20 भारतीय संघाचा उपकर्णधार असून, विराट कोहली आणि रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टीममधील सर्वात अनुभवी खेळाडूंमध्ये गणला जातो.
📌 महत्वाच्या बातम्या
- मराठा समाजाची लग्नासाठीची एक नवी आचारसंहिता, हुंडा घेणाऱ्यांशी आता….
- आदित्य ठाकरेंनी आपले आडनाव बदलून “खान” किंवा “शेख” करावे; नितेश राणेंची जोरदार टीका
- कॅन्सरशी झुंज देणाऱ्या हिना खानचं गुपचूप लग्न, रॉकीसोबत नव्या आयुष्याची सुरुवात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








