🕒 1 min read
Abu Azmi : मीरा-भाईंदरमध्ये मराठी आणि हिंदी भाषिकांमध्ये सुरु असलेल्या तणावाला आता आणखी धार आली आहे. काही दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्याने एका दुकानदाराला मारहाण केल्याच्या घटनेनंतर, हिंदी भाषिक व्यापाऱ्यांनी मोठा मोर्चा काढला होता. त्याच्या विरोधात मनसेनेही मोर्चा काढण्याचा निर्धार केला. मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारताच तणाव वाढला.
मंगळवारी मनसेने मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मनसे नेते अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं, तर अनेक कार्यकर्त्यांना अडवलं. तरीही काही वेळाने कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि मोर्चा निघालाच.
“MNS workers attack rickshaw drivers, yet no action!”
या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी मनसेवर ताशेरे ओढले आहेत. “मनसेच्या कार्यकर्त्यांनी कायद्याचा खेळखंडोबा केला आहे. टॅक्सी-रिक्षाचालकांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत अजूनही कुठलीही कठोर कारवाई झालेली नाही,” असं ते म्हणाले. मीरा रोडमधील अलीकडच्या मारहाणीच्या घटनेचा दाखला देत त्यांनी सरकारने लक्ष द्यावं, अशी मागणी केली.
ते पुढे म्हणाले, “जर तो दुकानदार रिक्षाचालक असता, तर कोणीही त्याच्या समर्थनार्थ बाहेर पडलं नसतं. यामध्ये सरकारचा आणि पोलिसांचा हात असल्याचा संशय निर्माण होतो.”
दरम्यान, या आंदोलनावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकही आक्रमक झाले. “शांततेच्या मार्गाने मोर्चा निघत असतानाही अडथळा आणला गेला. मी आमदार आहे, तरीही मला आणि आमच्या कार्यकर्त्यांना रोखलं जातंय,” असा आरोप करत सरनाईक यांनी पोलिस आयुक्तांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “स्वतःचं मूत्र पिणारा प्रसिद्धीसाठी काहीही करतो!”; परेश रावलवर भडकला ‘हा’ प्रसिद्ध खान
- “67 कोटीत 110 कोटींचं हॉटेल?”; सभागृहात शिरसाटांवर गोंधळ, फडणवीसांचा मोठा निर्णय
- “जास्त नाटकं झाली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे!” – राज ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





