🕒 1 min read
Sanjay Shirsat : विधान परिषदेच्या सभागृहात सोमवारी विट्स हॉटेल (VITS Hotel) लिलाव प्रकरणावरून मोठा गोंधळ झाला. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी थेट शिरसाटांच्या मुलावर नियम डावलून टेंडर प्रक्रियेत भाग घेतल्याचा ठपका ठेवला. त्यावेळी संबंधित कंपनी नोंदणीकृत नव्हती, तरीही लिलावात सहभागी झाली, असा गंभीर आरोप करण्यात आला.
“A hotel worth 110 crores for 67 crores?”; Confusion over the headscarves in the assembly
शिवाय, बनावट कागदपत्रांचा वापर झाल्याचंही दानवे यांनी सभागृहात ठणकावलं. यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. काही सदस्यांनी ‘सभापती न्याय द्या!’ अशा घोषणा दिल्या तर काहींनी शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संपूर्ण प्रक्रिया रद्द झाल्याचं जाहीर केलं. त्यांनी स्पष्ट केलं की, पारदर्शकतेसाठी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल.
त्यावर संतप्त झालेल्या संजय शिरसाट यांनी,”दलाली करण्यापेक्षा ऐकून घ्या,” असं म्हणत विरोधकांना सुनावलं. मात्र, या वक्तव्यावरही गदारोळ झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत सांगितलं की, संपूर्ण प्रक्रिया नव्याने राबवली जाईल आणि पारदर्शकतेच्या दृष्टीने उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याची खात्री दिली.
📌 महत्वाच्या बातम्या
- “जास्त नाटकं झाली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे!” – राज ठाकरे
- आमच्या दोघांतील ‘अंतरपाट’ अनाजीपंतांनी दूर केला – उद्धव ठाकरे
- “हे काम बाळासाहेबांना नाही जमलं, पण फडणवीसांना जमलं”; राज ठाकरेंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








