🕒 1 min read
पुणे : पुणे जिल्ह्यातील मुळशी येथे वैष्णवी हगवणे हिच्या दुर्दैवी मृत्यूनंतर मराठा समाजाने (Maratha Community) विवाह संदर्भात कडक आचारसंहिता जाहीर केली आहे. पुण्यातील सेंट्रल पार्क हॉटेल येथे पार पडलेल्या बैठकीत समाजातील प्रमुख नेत्यांनी हुंडा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला.
Maratha community has a new code of conduct for marriage
या निर्णयानुसार, यापुढे मराठा समाजात हुंडा घेणाऱ्या किंवा देणाऱ्या कुटुंबाशी रोटी-बेटी व्यवहार केला जाणार नाही. अशा कुटुंबांवर समाज बहिष्कार टाकेल. तसेच, छळ होणाऱ्या महिलांच्या पाठीशी त्यांचे माहेर उभे राहील, असे आश्वासनही देण्यात आले.
विवाह सोहळे साधेपणाने, वेळेवर, आणि कोणत्याही प्रकारच्या दिखाव्याशिवाय पार पडावेत, असेही ठरवले आहे. सामूहिक विवाह सोहळ्यांना प्राधान्य देण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला. समाजातील मानपानाची प्रथा कौटुंबिक मर्यादेत ठेवण्याचेही ठरविण्यात आले.
या बैठकीत श्रीकांत शिरोळे, भानुप्रताप बर्गे, श्रीमंत कोकाटे यांच्यासह अनेक समाज नेत्यांनी सहभाग घेतला आणि ही ठोस भूमिका मांडली.
📌 महत्वाच्या बातम्या
- आदित्य ठाकरेंनी आपले आडनाव बदलून “खान” किंवा “शेख” करावे; नितेश राणेंची जोरदार टीका
- कॅन्सरशी झुंज देणाऱ्या हिना खानचं गुपचूप लग्न, रॉकीसोबत नव्या आयुष्याची सुरुवात
- RCB ने जिंकला IPL 2025, पण कमाईच्या शर्यतीत मुकेश अंबानी नंबर वन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








