🕒 1 min read
बंगळुरु: आयपीएल 2025 च्या (IPL 2025) साखळी फेरीतील निर्णायक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) 6 विकेट्सने पराभव करत प्लेऑफमधील थेट क्वालिफायर फेरीत प्रवेश मिळवला. 227 धावांचं मोठं लक्ष्य असूनही RCB ने केवळ 19 षटकांत हे धावसंख्येचं पर्वत पार केला.
सामन्याची सुरुवात लखनौच्या भक्कम फलंदाजीने झाली. ऋषभ पंतने नाबाद 118 धावा, तर मिशेल मार्शने 67 धावा करत संघाला 227/3 पर्यंत नेलं. मात्र, त्यांच्या दमदार खेळीला बंगळुरुच्या फलंदाजांनी झकास उत्तर दिलं.
RCB’s historic win! Virat Kohli celebrates in jubilation, direct entry into the qualifiers
विराट कोहलीने संयमी आणि आक्रमक खेळ करत मोठी खेळी साकारली, तर जितेश शर्माने निर्णायक षटकांमध्ये चौकार-षटकारांची आतषबाजी करत सामना आपल्या बाजूने फिरवला. बंगळुरुने 18 वर्षांच्या IPL इतिहासातील सर्वात मोठा टार्गेट यशस्वीरित्या पूर्ण केला.
विजयानंतर विराट कोहली आणि टीमचा जल्लोष सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेषतः कोहलीच्या विजयी क्षणातील आनंदी चेहरा आणि खेळाडूंचा नाच, चाहते अगदी मनापासून एन्जॉय करत आहेत.
प्लेऑफ लढती जाहीर :
क्वालिफायर 1: RCB vs पंजाब किंग्ज – 29 मे
एलिमिनेटर: मुंबई इंडियन्स vs गुजरात टायटन्स
📌 महत्वाच्या बातम्या
- ऋषभ पंतचा झंझावाती शतकासह बॅकफ्लिप सेलिब्रेशन! RCBविरुद्ध खेळीत LSGने रचला डोंगराएवढा डाव
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शेतजमीन वाटणीपत्राची दस्त नोंदणी फी माफ; मंत्रिमंडळाचे १० महत्त्वाचे निर्णय जाहीर
- “तुम्ही कधी प्रेम केलंय का?” हिना खानचा श्री श्री रविशंकर यांना खासगी प्रश्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








