Share

आदित्य ठाकरेंनी आपले आडनाव बदलून “खान” किंवा “शेख” करावे; नितेश राणेंची जोरदार टीका

Nitesh Rane criticizes Aaditya Thackeray’s comment on Bakri Eid and advises him to change his surname. Urges Muslims to celebrate eco-friendly Eid, similar to how Hindus observe Diwali and Holi.

Published On: 

Aditya Thackeray should change his surname to "Khan" or "Sheikh"; Nitesh Rane strongly criticizes

🕒 1 min read

नागपूर : राज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. बकरी ईदसंदर्भात आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) गौसेवा आयोगाच्या आदेशावर प्रश्न उपस्थित करत सरकारला उद्देशून टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देताना नितेश राणे यांनी ठाकरेंनी आपले आडनाव बदलून “खान” किंवा “शेख” ठेवावे, असा टोला लगावला.

Aditya Thackeray should change his surname to “Khan” or “Sheikh”; Nitesh Rane

राणे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असलेले आदित्य जर अशा प्रकारची भूमिका घेत असतील, तर त्यांना ठाकरे हे आडनाव वापरण्याचा अधिकार नाही.” ते पुढे म्हणाले की, “सण साजरे करताना पर्यावरणाची काळजी घेण्याचा सल्ला फक्त हिंदूंनाच का दिला जातो? जसे हिंदू समाज होळी, दिवाळी इको फ्रेंडली करतो, तसेच मुस्लिमांनीही इको फ्रेंडली बकरी ईद साजरी करावी.”

दरम्यान, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नितेश राणेंना नोटीस दिली होती. त्यावर राणे यांनी पलटवार करत म्हटले की, “प्यारे खान यांनी मुस्लिम समाजाचे प्रबोधन करणे अपेक्षित आहे. इको फ्रेंडली बकरी ईद ही समाजहिताची बाब आहे. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ नये, यासाठीच माझा सल्ला होता.”

नितेश राणे यांनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा स्पष्ट केले की, “माझा हेतू कोणत्याही धर्माचा अपमान करण्याचा नाही. शांत महाराष्ट्र हवा असल्यास सर्व समाजांनी संयम आणि समजूतदारपणा दाखवावा.”

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
News Politics
MAHASATTA

🕘 संबंधित बातम्या