🕒 1 min read
मुंबई : ‘हेरा फेरी 3’ सिनेमाचं नाव घेतल्यावर लगेच बाबूराव गणपतराव आपटे आठवतो आणि त्या भूमिकेसाठी ओळखले जाणारे परेश रावल (Paresh Rawal). पण गेल्या काही दिवसांत त्यांनी या चित्रपटातून बाहेर पडण्याची घोषणा करताच एकच खळबळ उडाली होती. त्यांनी ट्विटरवर थेट सांगितलं की, “ही भूमिका म्हणजे गळ्यातला फास आहे, मी चित्रपटातून बाहेर पडतोय.” त्यानंतर प्रेक्षकांपासून निर्मात्यांपर्यंत सगळीकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या. काहींनी तर ‘बाबूरावशिवाय हेरा फेरी नाही’ असं ठामपणे म्हटलं.
“A person who drinks his own urine will do anything for fame!”
या सगळ्या गोंधळात परेश रावल यांना अक्षय कुमारच्या प्रोडक्शन हाऊसकडून 25 कोटींची कायदेशीर नोटीस मिळाली. काही दिवसांतच पुन्हा एकदा ट्वीटरवरून परेश रावल यांनी जाहीर केलं, “मी ‘हेरा फेरी 3’ मध्ये परततोय!”
यावरून पुन्हा एकदा चर्चेला पेट बसली आणि आता या प्रकरणात केआरके अर्थात कमाल आर. खान यांनी उडी घेतली आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत राहणाऱ्या केआरके यांनी परेश रावल यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.
त्यांनी लिहिलं, “जो माणूस स्वतःचं मूत्र पिऊन बरा होतो, तो प्रसिद्धीसाठी काहीही करू शकतो.” हा थेट टोला त्यांनी ट्विटरवर लगावला. पुढे ते म्हणाले, “परेश रावल हे संपूर्ण ड्रामा करत आहेत. हा निव्वळ एक पब्लिसिटी स्टंट आहे. ते हे चित्रपट कधीच सोडणार नव्हते.”
केआरकेची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून परेश रावल यांच्याकडून यावर अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण या सगळ्या गदारोळात ‘हेरा फेरी 3’चा उत्सुकतेचा थर मात्र अधिकच वाढला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





