Share

RCB ने जिंकला IPL 2025, पण कमाईच्या शर्यतीत मुकेश अंबानी नंबर वन

RCB finally won IPL 2025, but the real winner in terms of money was Mukesh Ambani. Jio Hotstar hit 64.3 crore viewers, bringing in huge revenue via ads and subscriptions.

Published On: 

RCB won IPL 2025, but Mukesh Ambani is number one in the revenue race

🕒 1 min read

IPL 2025 : 3 जून रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळलेल्या IPL 2025 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सचा 6 धावांनी पराभव करत पहिल्यांदाच चॅम्पियन बनण्याचा मान मिळवला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 18 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली.

या विजयानंतर RCB चाहत्यांमध्ये जल्लोष झाला, मात्र या फायनलने सर्वाधिक कमाईच्या बाबतीत मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना सर्वात मोठा फायदाही करून दिला. जिओ सिनेमा आणि हॉटस्टारच्या मर्जरनंतर ब्रॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म ‘जिओ हॉटस्टार’वर या सामन्याने तब्बल 64.3 कोटी प्रेक्षकांची नोंद केली. मागील वर्षीच्या 60.2 कोटींच्या आकड्यापेक्षा हा मोठा वाढ आहे.

RCB won IPL 2025, but Mukesh Ambani is number one in the revenue race

रिलायन्स इंडस्ट्रीजचा जिओ हॉटस्टारमध्ये 63.16% हिस्सा असून, यापैकी 46.82% वायकॉम 18 आणि 16.34% थेट गुंतवणुकीद्वारे आहे. या उच्च व्यूअरशिपमुळे अंबानींना जाहिरात आणि सब्सक्रिप्शनमधून मोठी आर्थिक कमाई झाली.

IPL दरम्यान 10 सेकंदाच्या जाहिरातीसाठी 18-19 लाख रुपये घेतले जातात, आणि 2025 मध्ये या दरात 20-30% वाढ होण्याची शक्यता होती. या आधारावर मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानी यांनी या हंगामात 6,000 कोटी रुपयांपर्यंत कमाई केली असावी.

सध्या अद्याप कोणतीही अधिकृत आकडेवारी समोर आलेली नसली तरी जिओ हॉटस्टारच्या माध्यमातून या IPL सीजनमध्ये अंबानींनी प्रचंड पैसा कमावला, हे स्पष्ट आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
News Sports
MAHASATTA

🕘 संबंधित बातम्या