Share

आमच्या दोघांतील ‘अंतरपाट’ अनाजीपंतांनी दूर केला – उद्धव ठाकरे

Uddhav and Raj Thackeray reunite on stage, launch sharp attack on BJP over Hindi policy, call for Marathi unity.

Published On: 

The 'gap' between us was removed by the grain farmers - Uddhav Thackeray

🕒 1 min read

वरळी : वरळी डोममध्ये शनिवारी पार पडलेल्या ‘विजयी मेळाव्या’त उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) हे दोन राजकीय बंधू एकत्र आले आणि व्यासपीठावरुन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे या दोन्ही पक्षांनी केंद्र व राज्य सरकारविरोधात संयुक्तपणे लढण्याची भूमिका घेतली. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीकेची झोड उठवली.

उद्धव ठाकरे म्हणाले, “आज आमच्या दोघांतील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला आहे. आता अक्षता टाकायची गरजच नाही. आम्ही दोघं एकत्र आलो आहोत, आणि राहणार आहोत. आता तुम्हाला वापरून फेकणाऱ्यांना आम्हीच फेकून देणार आहोत.” त्यांनी राज ठाकरेंचा ‘सन्माननीय’ असा उल्लेख करत त्यांच्या भूमिकेचंही कौतुक केलं.

The ‘gap’ between us was removed by the grain farmers 

भोंदूबाबांवरही त्यांनी निशाणा साधला. “आज बुवा-महाराजांनी सगळी बाजू घेतलीय. कोण लिंबू कापतोय, कोण रेडा! माझ्या आजोबांनी या अंधश्रद्धेविरुद्ध लढा दिला होता. त्यांच्याच विचारासाठी आम्ही एकत्र आलो आहोत,” असं ते म्हणाले.

हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून भाजपवर हल्ला करताना ठाकरे म्हणाले, “तुम्ही म्हणता आम्ही हिंदुत्व सोडलं, पण आम्ही कडवट देशाभिमानी मराठी हिंदू आहोत. आम्ही काश्मीरमधून 370 हटवायला पाठिंबा दिला, पण मुंबईत मराठीसाठी आवाज उठवला तर आम्ही गुंड ठरलो?”

राज्यात उद्योगधंदे गुजरातला गेल्याचा मुद्दा उपस्थित करत उद्धव म्हणाले, “2014 नंतर उद्योग मुंबईबाहेर गेले. आमचं सरकार पाडून तुमचं मालकशाहीचं काम चाललंय. दोन व्यापाऱ्यांसाठी राज्य विकलं जातंय.”

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
News Politics
MAHASATTA

🕘 संबंधित बातम्या