Share

कॅन्सरशी झुंज देणाऱ्या हिना खानचं गुपचूप लग्न, रॉकीसोबत नव्या आयुष्याची सुरुवात

Hina Khan, currently fighting breast cancer, marries her long-time boyfriend Rocky Jaiswal in a private ceremony. She shared emotional wedding photos on Instagram, surprising her fans.

Published On: 

Hina Khan, who is battling cancer, secretly marries, starts a new life with Rocky

🕒 1 min read

Hina Khan : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खानने (Hina Khan) तिच्या दीर्घकालीन बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत (Rocky Jaiswal) अगदी गुपचूपपणे लग्न केलं आहे. हिनाने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. 4 जून 2025 रोजी शेअर करण्यात आलेल्या या फोटोंसह तिने एक भावनिक पोस्टही लिहिली आहे, ज्यात तिने आपल्या प्रेमकथेचा आणि एकत्र प्रवासाचा उल्लेख केला आहे.

हिना गेल्या काही महिन्यांपासून स्तनाच्या कर्करोगाशी (ब्रेस्ट कॅन्सर) लढा देत आहे. केमोथेरपी आणि उपचारांच्या दरम्यानच तिने आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. हे लग्न अगदी साधेपणाने आणि खासगी पद्धतीने पार पडलं. सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहेत.

Hina Khan, who is battling cancer, secretly marries

हिना आणि रॉकी यांचं नातं जवळपास 11 वर्षांपासून सुरु आहे. त्यांच्या प्रेमाची सुरुवात ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेच्या सेटवर झाली होती. रॉकी त्या मालिकेचा पर्यवेक्षक निर्माता होता. 2014 पासून दोघं एकमेकांना डेट करत होते, आणि आता त्यांच्या नात्याला अधिकृत नाव मिळालं आहे.

हिनाने लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, “दोन वेगवेगळ्या जगातून, आम्ही एक प्रेमाचं जग निर्माण केलं आहे. आमचं बंधन आता कायमचं आहे. पत्नी आणि पती म्हणून तुमच्या आशीर्वादांची अपेक्षा ठेवतो.”

हिनाच्या या निर्णयाने तिचे चाहते आनंदित झाले असून सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
News Entertainment
MAHASATTA