🕒 1 min read
Supriya Sule : राज्याच्या राजकारणात तापलेलं वातावरण पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलंय. मीरा-भाईंदरमध्ये मराठी आणि हिंदी भाषिकांमध्ये उसळलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
“सरन्यायाधीश महाराष्ट्रात असताना, अधिवेशन सुरू असताना गृहखातं काय करतंय? आज जर काही जबाबदार असेल तर ते मुख्यमंत्री आणि गृहखातंच,” असा रोखठोक सवाल करत सुळेंनी भाजपवर जोरदार टीका केली.
“Fadnavis is responsible for the Mira-Bhayander row”
त्यांनी स्पष्ट केलं की, “लोकशाहीत आंदोलनाचा हक्क आहे. पण सध्या जी भाषा, वर्तन आणि धमक्यांचा प्रकार सुरू आहे, तो भाजपला शोभणारा नाही. हे कुठून आलेलं संस्कृतीचं विकृतीकरण आहे?”
मीरा-भाईंदर राड्यात हिंदी सक्तीवरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांबाबतही सुळेंनी भाजपलाच जबाबदार धरलं. “ना अजित पवार म्हणतात हिंदी सक्ती आम्ही केली, ना शिंदे गट मान्य करतो. मग कोण करतंय सक्ती? अर्थात भाजप!” असा दावा त्यांनी केला.
राज्यातील विनाअनुदानित शिक्षक आंदोलनात सुळे सहभागी झाल्या असताना, शिक्षकांनी थेट अजित पवार यांचं नाव घेत मागण्यांबाबत चर्चा केली. त्यावर सुळे म्हणाल्या, “भाऊ अर्थमंत्री असले तरी सरकार चालवण्याचे निर्णय फडणवीसच घेतात.”
त्यामुळे, “देवेंद्र फडणवीस हाय हाय,” असा नाराजीचा सूर सुळेंनी उघडपणे मांडला.
📌 महत्वाच्या बातम्या
- “मनसे कार्यकर्त्यांकडून रिक्षाचालकांवर हल्ले, तरीही कारवाई नाही!”; अबू आझमींचा मनसेवर घणाघात
- “स्वतःचं मूत्र पिणारा प्रसिद्धीसाठी काहीही करतो!”; परेश रावलवर भडकला ‘हा’ प्रसिद्ध खान
- “67 कोटीत 110 कोटींचं हॉटेल?”; सभागृहात शिरसाटांवर गोंधळ, फडणवीसांचा मोठा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








