Share

IPL 2025: पंजाब किंग्सचा ऐतिहासिक विजय, मुंबई इंडियन्सला हरवून रचले अनेक विक्रम

Punjab Kings defeated Mumbai Indians by 5 wickets in IPL 2025 Qualifier 2, chasing 204 runs and reaching the final after 11 years. They broke multiple records with this historic win.

Published On: 

IPL 2025: Punjab Kings' historic victory, setting many records by defeating Mumbai Indians

🕒 1 min read

अहमदाबाद : आयपीएल 2025 (IPL 2025) स्पर्धेच्या क्वॉलिफायर 2 फेरीत पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सचा 5 गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली. मुंबईने विजयासाठी दिलेलं 204 धावांचं लक्ष्य पंजाबने अवघ्या 19 षटकांत पार करत नवा इतिहास रचला.

पंजाब किंग्सने 11 वर्षांनंतर आयपीएलची अंतिम फेरी गाठली आहे. याआधी 2014 मध्ये त्यांनी अंतिम फेरी गाठली होती, मात्र तेव्हा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं.

IPL 2025: Punjab Kings’ historic victory

या सामन्यात पंजाबच्या फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत प्लेऑफमध्ये 200 हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करणारा पहिलाच संघ होण्याचा मान मिळवला. या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात संघाने मुंबई इंडियन्सविरुद्ध 204 धावांचा विक्रमी पाठलाग यशस्वी केला.

ही केवळ पंजाब किंग्सची मुंबई इंडियन्सविरुद्ध 200+ धावांचा पाठलाग करताना पहिलीच विजयश्री होती. विशेष म्हणजे, पंजाब किंग्सने आयपीएलमध्ये आठ वेगवेगळ्या संघांविरुद्ध 200 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग यशस्वी केला आहे, जे कोणत्याही संघाला जमलेलं नाही.

तसंच, आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्सने 9व्या वेळेस 200 हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला असून, एका हंगामातील सर्वाधिक 200+ रन चेसचा हा विक्रम आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
News Sports
MAHASATTA

🕘 संबंधित बातम्या