🕒 1 min read
IPL 2025 final : आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव करून प्रथमच ट्रॉफी उचलली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या ऐतिहासिक सामन्यानंतर विराट कोहलीचे (Virat Kohli) भावनिक क्षण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या विजयाचा सर्वात भावनिक क्षण पाहायला मिळाला, जेव्हा विराट कोहली मैदानातच ढसाढसा रडू लागला. 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर RCBला आयपीएल ट्रॉफी मिळाल्याचा आनंद विराटच्या अश्रूंमधून दिसून येत होता.
Virat Kohli gets emotional as Anushka hugs him
सामन्यानंतर मैदानावर आलेली अनुष्का शर्मा, विराटला मिठी मारताच तो आणखीनच भावूक झाला. अनुष्काच्या चेहऱ्यावर अभिमान स्पष्टपणे दिसत होता. तिच्या मिठीने विराटच्या भावना अनावर झाल्या आणि तो अक्षरश: बाळासारखा रडू लागला.
या क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, चाहत्यांसाठी हा क्षण आयुष्यात विसरण्यासारखा नाही. सामना पाहण्यासाठी उपस्थित असलेले चाहत्यांनी आणि खेळाडूंनीही या विजयाचा जल्लोष केला.
विजयानंतर विराट म्हणाला, “हा विजय केवळ संघासाठीच नाही, तर आमच्या लाखो चाहत्यांसाठी आहे. मी RCBसाठी सर्व काही दिलं. आजचा दिवस मी कधीही विसरणार नाही.”
📌 महत्वाच्या बातम्या
- चाकणकर कोण आहे? रश्मिका मंदाना आहेत का त्या? सुषमा अंधारेंची खोचक टीका
- निवडणुकीनंतर अडगळीत पडलेल्या महिला राजीनामा मागतायत; रुपाली चाकणकरांचं विरोधकांना प्रत्युत्तर
- मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडले 47 विषारी साप; सुरक्षा रक्षकही हादरले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





