🕒 1 min read
पुणे: महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी केलेल्या वक्तव्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी जोरदार पलटवार केला आहे. “चाकणकरांवर बोलून आम्हाला प्रसिद्धी मिळेल, त्या काय रश्मिका मंदाना आहेत का?”, असा टोला त्यांनी लगावला.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नुकतीच राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची मुंबईत भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे यांनी बोलताना राज्यपालांच्या भूमिकेचे कौतुक केले. त्यांनी मागील राज्यपालांच्या तुलनेत विद्यमान राज्यपाल अधिक निष्पक्ष असल्याचे सांगितले.
Is she Rashmika Mandana? Sushma Andhare’s harsh criticism
रुपाली चाकणकर यांनी विरोधक माझ्यावर टीका करून प्रसिद्धी मिळवू पाहत आहेत, असे म्हणत सुषमा अंधारेंवर अप्रत्यक्ष टोला लगावला होता. यावर प्रतिक्रिया देताना अंधारे म्हणाल्या, “रुपाली चाकणकर कोण आहेत? त्या रश्मिका मंदाना आहेत का की स्मृती इराणी? त्या कोणत्या क्षेत्रातील स्टार आहेत, ज्यांच्यावर बोलल्याने प्रसिद्धी मिळते? काही लोक स्वतःबाबत फारच गैरसमज करून घेतात.”
अंधारे यांनी पुढे म्हटले की, “चाकणकर हा अत्यंत छोटा विषय आहे. त्यांच्यावर बोलण्याचे आम्हाला काही कारण नाही. त्यांच्या लाडक्या नेत्यांनी त्यांना वास्तवात आणावे.”
तसेच, महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पूर्णवेळ आणि कायद्याचं ज्ञान असलेली व्यक्ती असावी, असे मतही सुषमा अंधारे यांनी मांडले. “ईमेल पाठवणे म्हणजे स्यूमोटो प्रक्रिया समजणे, हे हास्यास्पद आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले.
दरम्यान, या टीकेला प्रत्युत्तर देताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, “महाविकास आघाडीच्या काळात मला महिला आयोगाचे अध्यक्षपद मिळाले आहे. यावरून ते काय बोलतात हे ठरवावं. सध्या माझ्यावर टीका करणाऱ्यांपैकी काही महिला निवडणुकीनंतर अडगळीत पडल्या आहेत आणि त्यांना कोणी विचारत नाही, म्हणून त्या टीका करत आहेत,” असे चाकणकर यांनी सांगितले.
राजकीय वर्तुळात आता या वादावर पुढे काय घडते, याकडे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- निवडणुकीनंतर अडगळीत पडलेल्या महिला राजीनामा मागतायत; रुपाली चाकणकरांचं विरोधकांना प्रत्युत्तर
- मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडले 47 विषारी साप; सुरक्षा रक्षकही हादरले
- पुढील 2 दिवस महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पाऊस कोसळणार; पंजाबराव डख यांचा पावसाचा अंदाज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








