Share

निवडणुकीनंतर अडगळीत पडलेल्या महिला राजीनामा मागतायत; रुपाली चाकणकरांचं विरोधकांना प्रत्युत्तर

State Women’s Commission chief Rupali Chakankar has answered critics calling for her resignation, stating the opposition is targeting her for publicity. Congress leader Sangeeta Tiwari was also upset after being denied entry to Raj Bhavan.

Published On: 

Women who are stuck after the elections are demanding resignation; Rupali Chakankar's response to the opposition

🕒 1 min read

Rupali Chakankar : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या (Women Commission) कार्यपद्धतीवर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून राजीनाम्याची मागणी होत आहे. यावर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट करत विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

“महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला हे पद देण्यात आलं होतं. त्यामुळे विरोधकांनी आधी ठरवावं, त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे,” असं चाकणकर म्हणाल्या. त्यांनी पुढे सांगितले की, “पूर्वीही महिला आयोगाच्या अध्यक्षा कोणत्यातरी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा होत्या. आज ज्या महिला टीका करत आहेत, त्या निवडणुकीनंतर अडगळीत पडलेल्या आहेत आणि प्रसिद्धीसाठी आयोगावर टीका करत आहेत.”

Women who are stuck after the elections are demanding resignation; Rupali Chakankar

तसेच फुके प्रकरणातील महिलेचे पत्र आपल्याकडे पोहोचले नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. “आमच्याकडे टपाल आणि फोनद्वारे तक्रारी घेण्याची सोय आहे. फोनसेवा कार्यालयीन वेळेत सुरु असते. आयोगाचा नंबर बंद असल्याची बातमी चुकीची आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, मविआच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे आयोगाच्या कामकाजाबाबत तक्रार करण्यासाठी भेट घेतली. मात्र काँग्रेसच्या नेत्या संगीता तिवारी यांना राजभवनात प्रवेश नाकारल्याने त्या नाराज झाल्या. “माझा अपमान झाला. मला आत जाण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे मी नाराजीने पुण्याकडे परत जात आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
News Politics
MAHASATTA

🕘 संबंधित बातम्या