Share

‘ज्यांच्यावर धनंजय मुंडेंनी आरोप केले, त्यांच्यासोबतचेच फोटो व्हायरल!’ बीडमध्ये राजकीय भूकंप

Beed MLA Dhananjay Munde faces flak after photos with molestation accused go viral; political blame game begins.

Published On: 

‘Photos with those whom Dhananjay Munde accused go viral!’ Political earthquake in Beed

🕒 1 min read

बीड : अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणात नवीन वळण आलं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी विजय पवार याचे काही जुने फोटो आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासोबत व्हायरल झाल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

बीडमधील खासगी क्लासमध्ये दोन शिक्षकांनी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. पोलिसांनी आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केलं असता, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

‘Photos with those whom Dhananjay Munde accused go viral!’

दरम्यान, याच प्रकरणावरून काल रात्री आमदार धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर थेट आरोप केले. “गुन्हा झाल्यानंतर स्थानिक आमदार आरोपींसोबत होते, त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासा,” अशी मागणी करत एसआयटीमार्फत तपासाची मागणीही त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊनही त्यांनी याबाबतची तक्रार मांडली.

परंतु आज सकाळीच सोशल मीडियावर आरोपी विजय पवार याचे खुद्द धनंजय मुंडे यांच्यासोबतचे जुने फोटो व्हायरल झाले. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांचा भडका उडाला असून, आरोप-प्रत्यारोपांची मालिका नव्याने सुरू झाली आहे.

या पार्श्वभूमीवर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी स्पष्ट भूमिका घेतली. “कोणताही गुन्हा लपवू नये. आरोपी कोणीही असो, कठोर कारवाई झाली पाहिजे,” असं ते म्हणाले. तसेच, “संदीप क्षीरसागरांवर आरोप करणे सोपं आहे, पण त्याचा तपास व्हावा आणि दोष सिद्ध झाल्यास आमचीही सहमती असेल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

याचदरम्यान, “संतोष देशमुख खून प्रकरणात जे बोलत होते, ते आता गप्प का?” असा सवाल करत धनंजय मुंडेंनी विरोधकांवर निशाणा साधला. त्यावर खासदार सोनवणे म्हणाले, “आम्ही पहिल्याच दिवशी प्रतिक्रिया दिली. जे चार दिवसांनी बोलले, त्यांना लाज वाटते की नाही, हे त्यांनाच विचारावं.”

राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या या वादळात, बीडमधील विनयभंग प्रकरणातील सत्य काय आहे, हे तपास यंत्रणाच स्पष्ट करू शकतील.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
News Politics
MAHASATTA

🕘 संबंधित बातम्या