🕒 1 min read
मुंबई : ‘पंचायत’ वेब सिरीजमधील क्रांती देवी या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री सुनीता राजवरने (Sunita Rajwar) बॉलिवूडमधील कटू वास्तव समोर आणलं आहे. तिच्या अनुभवातून इंडस्ट्रीतील भेदभाव, लाचारी आणि दुय्यम वागणुकीचं वास्तव पुन्हा एकदा उजेडात आलं आहे.
Panchayat fame actress says, “We were treated like animals on the set”
सुनीता म्हणाली, “सेटवर काही कलाकारांशी प्राण्यांसारखी वागणूक केली जाते. काही कलाकार अत्यंत कमी पैशांत काम करायला तयार होतात कारण त्यांच्या खांद्यावर घरचं ओझं असतं. पोटासाठी गप्प बसून सर्वकाही सहन करावं लागतं.”
तिने पुढे म्हटलं, “मोठे कलाकार आले की, त्यांच्यासाठी सगळं बदलतं. त्यांच्यासाठी स्वच्छ खोल्या, फ्रिज, मायक्रोवेव्ह हे सगळं असतं. पण आमच्यासारख्या कलाकारांना अस्वच्छ रूम्स दिल्या जातात. अनेकदा एका खोलीत ३-४ लोकांना बसवतात. बाथरूम देखील वापरण्यास लायक नसतो. बेडशीट मळलेली असते. अपमानास्पद वाटतं.”
“कधी सीन नसलं तरीही कलाकारांना तासन् तास सेटवर बोलावून ठेवतात. गरज असेल तेव्हा बोलवावं, उगाच मानहानी करू नये. पण या गोष्टी इंडस्ट्रीमध्ये सर्रास घडतात,” असा आरोपही तिने केला.
‘पंचायत’ मालिकेनं अनेक कलाकारांच्या करिअरला चालना दिली. सुनीता राजवरसोबत नीना गुप्ताही मालिकेतील मुख्य भूमिकेत होत्या. ‘बधाई हो’ नंतर नीना गुप्तांचं करिअर पुन्हा उंचावलं आणि त्यांनीही एकेकाळी संघर्षाचा सामना केल्याचं उघडपणे कबूल केलं आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “अक्षता टाकायची संधी कधी देताय?” आजोबांनी विचारलं, युगेंद्र पवारांनी थेट उत्तर दिलं!
- “अचानक मृत्यू होईल!” शेफालीच्या कुंडलीवर या ॲक्टरने आधीच वर्तवले होते भाकीत
- “ठाकरे बंधूंवर डोमकावळे कावकाव करतायत”, राऊतांचा सरकारला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





