Share

“याला मराठी माणूस जाम चोपेल!”, गुणरत्न सदावर्तेवर मनसेचा घणाघात

MNS leader lashes out at Sadavarte, urges BJP to muzzle him ahead of Raj Thackeray’s mega Marathi march.

Published On: 

"Marathi people will crush him!", MNS attacks Gunaratna Sadavarte

🕒 1 min read

मुंबई : आगामी ५ जुलै रोजी मनसेकडून (MNS)  मराठी भाषेसाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी भाजपवर निशाणा साधत अॅड. गुणरत्न सदावर्तेंना (Sadavarte) थेट इशारा दिला. “याला मराठी माणूस जाम चोपेल. भाजपने त्याच्या तोंडाला पट्टी लावावी,” असे तीव्र शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

जाधव म्हणाले, “राज ठाकरेंनी मराठीसाठी नेहमीच पहिले पाऊल उचललं आहे. काल त्यांनी संजय राऊतांना फोन करून दोन मोर्चांऐवजी एकत्रित मोर्चाची कल्पना मांडली. मराठी माणसाचा आवाज थेट दिल्लीपर्यंत पोहोचवायचा आहे.”

“Marathi people will crush him!”, MNS attacks Gunaratna Sadavarte

यावेळी सदावर्तेंवर टीका करताना जाधव म्हणाले, “सदावर्ते हा भाजपचा पाळीव माणूस आहे. तो सातत्याने मराठी जनतेविरोधात भूमिका घेतोय. जर इतकाच शूर आहेस, तर जा दक्षिणेकडे, तिथे बोलून दाखव. इथे याला मराठी माणूस बाहेर फिरू देणार नाही.”

सदावर्तेंनी राज ठाकरे यांच्या मोर्चाला विरोध करत परवानगी नसल्याचे मत व्यक्त केले होते. तसेच भाषिक वाद निर्माण होत असल्याचा आरोप करत पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावं, अशी मागणी केली होती. त्यावरून मनसैनिकांत संतापाची लाट उसळली आहे.

दरम्यान, मराठी आणि हिंदी मिश्र भाषेचा प्रश्न उपस्थित करत जाधव म्हणाले, “माझा मुलगा चौथीत आहे आणि तोही बोलताना मराठी-हिंदी मिक्स करतो. ही मेंदूवरची कृती आहे. हे सरकार मुद्दाम हिंदी लादत आहे. दिल्लीचे मनसुबे राबवले जात आहेत.”

शिक्षणाच्या नव्या धोरणावरही जाधवांनी टीका केली. “स्विमिंग, तबला यांसारख्या स्कोरिंग विषयांसोबत हिंदी अनिवार्य का? आम्हाला एखादी कलात्मक मराठी भाषा द्या,” अशी मागणी त्यांनी केली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
News Politics
MAHASATTA

🕘 संबंधित बातम्या