Share

“राज ठाकरे यांची अवस्था हसण्यासारखी!”, राज-उद्धव मोर्चावर सदावर्तेंचा हल्लाबोल

G. Sadvate calls Raj-Uddhav Hindi protest illegal and laughable

Published On: 

“Raj Thackeray's situation is laughable!”, Sadavarte's attack on Raj-Uddhav Morcha

🕒 1 min read

मुंबई : हिंदी सक्तीविरोधातील ५ जुलैच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या घोषणेनंतर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावरून वकील गुणरत्न सदावर्ते (sadavarte) यांनी बोचरी प्रतिक्रिया देत जोरदार टीकास्त्र सोडलं.

“Raj Thackeray’s situation is laughable!”

सदावर्ते म्हणाले, “हा मोर्चा म्हणजे गल्लीतील निवडणुकीसाठीची तयारी आहे. खोट्या नॅरेटिव्हचा प्रचार करून लोकांची दिशाभूल केली जात आहे.” त्यांनी हिंदी ऐच्छिक असून मराठी हीच राज्यभाषा असल्याचा पुनरुच्चार केला. त्याचबरोबर २०२० मधील शैक्षणिक त्रिभाषा सूत्राचा दाखला देत, हा मोर्चा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रचल्याचा आरोप केला.

“ठाकरे बंधू खोटं नॅरेटिव्ह पसरवत आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार अशा प्रकारचा मोर्चा काढण्यास बंदी आहे,” असा दावा करत सदावर्तेंनी या आंदोलनाला बेकायदेशीर ठरवलं. “राज ठाकरे यांची अवस्था सध्या हसण्यासारखी झाली आहे,” असंही त्यांनी टोला लगावला.

याच चर्चेदरम्यान, मनसे नेते प्रकाश महाजन आणि सदावर्ते यांच्यात शाब्दिक चकमक झाली. महाजन यांनी “कोण मुंबईचा फौजदार?” असा टोला लगावताच सदावर्तेंनीही त्यांच्यावर दलालीचा आरोप करत प्रत्युत्तर दिलं. दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Politics News
MAHASATTA

🕘 संबंधित बातम्या