🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai) यांच्या नात्याबाबत गेल्या काही काळात अनेक तर्क-वितर्क, अफवा आणि चर्चांना उधाण आलं होतं. सोशल मीडियावर दोघे क्वचितच एकत्र दिसू लागल्यानंतर, घटस्फोटाच्या चर्चांना आणखी फाटा मिळाला. मात्र यावर खुद्द अभिषेक बच्चननेच आता मौन सोडले आहे.
एका मुलाखतीत अभिषेकने स्पष्टपणे सांगितलं की, “माझ्या वैयक्तिक आयुष्यावर लोक जे काही बोलतात, त्याचा मला फारसा फरक पडत नाही. पण जेव्हा या गोष्टी माझ्या कुटुंबाला दुखावतात, तेव्हा ते असह्य होतं. नकारात्मकतेचा आजार पसरवणाऱ्या लोकांनी त्यांच्या अंतरात्म्याशी प्रामाणिक राहायला हवं.”
Abhishek Bachchan finally breaks his silence on divorce talks with Aishwarya
ट्रोलिंगच्या वाढत्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करत अभिषेक म्हणतो, “आज एखाद्याच्या पोस्टवर काहीही लिहिणं फार सोपं झालं आहे. पण हे करताना लोक विचारच करत नाहीत की, समोरच्याला खरंच यातून त्रास होतो. अशी वक्तव्यं करणाऱ्यांना मी एकच सांगू इच्छितो, जर तुमचं काही म्हणणं असेल, तर समोर येऊन सांगा.”
एक किस्सा सांगताना अभिषेकने स्पष्ट केलं की, एका ट्रोलरच्या आक्षेपार्ह्य कमेंटवर त्याचा मित्र सिकंदर खेरने थेट आपला पत्ता पोस्ट करत त्या ट्रोलरला आमनेसामने बोलण्याचं आव्हान दिलं होतं. “हिम्मत असेल तर समोर या आणि बोला,” असं आव्हान खुद्द अभिषेकनेही दिलं.
दरम्यान, अभिषेक बच्चन लवकरच ‘कालीधर लापता’ या झी5 वरील चित्रपटात झळकणार आहे. हा थरारपट ४ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- पंचायत फेम अभिनेत्री म्हणते, “सेटवर आम्हाला प्राण्यांसारखी वागणूक”
- “अक्षता टाकायची संधी कधी देताय?” आजोबांनी विचारलं, युगेंद्र पवारांनी थेट उत्तर दिलं!
- “अचानक मृत्यू होईल!” शेफालीच्या कुंडलीवर या ॲक्टरने आधीच वर्तवले होते भाकीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now






