Share

“अक्षता टाकायची संधी कधी देताय?” आजोबांनी विचारलं, युगेंद्र पवारांनी थेट उत्तर दिलं!

Sharad Pawar’s grandson Yugendra Pawar gets engaged to Mumbai-based Tanishka Prabhu in a private family event.

Published On: 

“When will you give me a chance to throw a punch?” Grandpa asked, Yugendra Pawar answered directly!

🕒 1 min read

पुणे : पवार कुटुंबात पुन्हा एकदा शुभमंगल घडामोड. अजित पवार यांचे पुतणे आणि शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार (Yugendra Pawar) साखरपुड्याच्या बंधनात अडकले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवरून युगेंद्र आणि तनिष्का प्रभू यांच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत ही माहिती दिली.

साखरपुडा अगदी घरगुती वातावरणात पार पडला. युगेंद्र पवार यांच्या होणाऱ्या पत्नी तनिष्का प्रभू मूळच्या मुंबईच्या असून त्यांनी परदेशात शिक्षण घेतलं आहे. त्या फायनान्स क्षेत्रात शिक्षित आहेत.

Grandpa asked, Yugendra Pawar answered directly!

विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचाही साखरपुडा झाला होता. ऋतुजा पाटील या त्यांच्या होणाऱ्या पत्नी असून त्या साताऱ्यातील फलटणचे प्रसिद्ध उद्योजक प्रविण पाटील यांची कन्या आहेत. त्या एका सोशल मीडिया कंपनीचं व्यवस्थापन पाहतात.

जय आणि ऋतुजाची काही वर्षांपासून ओळख असून साखरपुड्यापूर्वी त्यांनी पवार कुटुंबप्रमुख शरद पवार यांची मोदीबाग निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतला होता.

यापूर्वी शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक खास टोमणा मारला होता — “जास्त लांबवू नका रे, अक्षता टाकायची संधी कधी देताय?”… आणि आज त्याचं उत्तर युगेंद्र पवारांनी साखरपुडा करून दिलं आहे!

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
News Politics
MAHASATTA

🕘 संबंधित बातम्या