🕒 1 min read
मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा आपल्या खास शैलीत भाजपकडे झुकणाऱ्या नेत्यांवर घणाघात केला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील नव्या पिढीतील काही नेते भाजपसोबत जाण्याच्या प्रयत्नात असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना राऊतांनी, “तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी पित नाही,” असे तीव्र शब्द वापरत टोला लगावला.
ते पुढे म्हणाले, “तहान लागली असेल, पण कोणत्या डबक्यात उडी मारायची हे ठरवताना शहाणपणा हवा. भाजप हा महासागर असला, तरी त्यात प्रत्येकाला स्वतःचं स्थान शोधावं लागतं. आज जे गेले आहेत, ते सुद्धा अस्तित्वासाठी झगडत आहेत. नवीन गेलेले काय वेगळं करणार?”
“No one drinks sewer water because they are thirsty”; Sanjay Raut takes a dig at Supriya Sule
राऊतांनी स्पष्टपणे सांगितले की, शरद पवार हे भाजपसोबत जाणार नाहीत. “पवार साहेब हे राजकारणात आजही कोचिंगच्या भूमिकेत सक्रिय आहेत. त्यांची विचारधारा वेगळी असून, भाजपसोबत जाण्याची शक्यता नाही,” असं त्यांनी नमूद केलं.
राजकीय नेते स्वतःचा स्वार्थ आणि तात्काळ फायद्यांसाठी पक्ष बदलत असल्याचं सांगत राऊत म्हणाले, “राजकारण आता स्वार्थी आणि मतलबी झालं आहे. लोकांवर दबाव असतो, प्रॉपर्टी वाचवायची असते म्हणून भाजपकडे झुकतात.”
शिवसेनेतीलच अनेक नेते – एकनाथ शिंदे, नारायण राणे, राज ठाकरे यांचा संदर्भ देत राऊत म्हणाले, “आमच्याच घडवलेल्या लोकांनी आमचाच विश्वासघात केला, हे दुर्दैव आहे.”
📌 महत्वाच्या बातम्या
- वैष्णवी प्रकरणात वकिलांच्या आरोपांचा कुटुंबीयांकडून जोरदार निषेध; रोहिणी खडसेही संतापल्या
- अहिल्यादेवी स्मृतीस्थळाच्या विकासासाठी 681 कोटींचा ऐतिहासिक निर्णय, अजित पवारांच्या नियोजन विभागाची मंजुरी
- ‘डर्टी पीआर गेम्स’च्या आरोपांना दीपिकाचं सडेतोड उत्तर; अप्रत्यक्षपणे संदीप वांगावर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








