Share

‘डर्टी पीआर गेम्स’च्या आरोपांना दीपिकाचं सडेतोड उत्तर; अप्रत्यक्षपणे संदीप वांगावर निशाणा

Deepika Padukone indirectly answers Sandeep Reddy Vanga’s accusations after her exit from the film Spirit, saying she finds peace in staying honest and true to her decisions.

Published On: 

Deepika's blunt response to allegations of 'dirty PR games'; Indirectly targets Sandeep Vanga

🕒 1 min read

मुंबई: ‘स्पिरीट’ चित्रपटातून अचानक माघार घेतल्यानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यातील शाब्दिक वाद चांगलाच गाजतोय. संदीपने दीपिकावर ‘डर्टी पीआर गेम्स’ खेळल्याचा आरोप केल्यानंतर आता दीपिकाने एका कार्यक्रमात अप्रत्यक्षपणे सडेतोड उत्तर दिल्याचं बोललं जातंय.

🎤 दीपिकाचं शांत, पण ठाम उत्तर

मुंबईतील एका कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दीपिका म्हणाली, “मला वाटतं की मला संतुलित ठेवणारी गोष्ट म्हणजे फक्त खरं असणं आणि प्रामाणिक वागणं. जेव्हा मी कठीण निर्णय घेते, तेव्हा त्या निर्णयांवर ठाम राहणं हे माझ्या मनाला शांती देतं.”

या विधानामध्ये तिने संदीपचं नाव घेतलं नसले तरी, ‘स्पिरीट’मधून बाहेर पडल्यावर झालेल्या आरोपांवर तिचं हे उत्तर असल्याचं अनेकांना वाटत आहे.

Deepika’s blunt response to allegations of ‘dirty PR games’; Indirectly targets Sandeep Vanga

🗣️ संदीप वांगाचं वक्तव्य

दीपिकाच्या निर्णयानंतर संदीपने सोशल मीडियावर तिच्यावर अप्रत्यक्ष टीका करत लिहिलं होतं की, “तू इतरांना माझी कथा सांगून तुझ्या स्त्रीवादाचा अर्थ स्पष्ट केलास का? तुला दिग्दर्शनाची किंमत समजत नाही, ना कधी समजेल…” तसंच त्याने ‘खुंदक में बिल्ली खंबा नोचे’ अशी हिंदी म्हण वापरून दीपिकेवर उपहासात्मक निशाणा साधला होता.

🎬 ‘स्पिरीट’मध्ये आता तृप्ती डिमरी

दीपिकाच्या माघारी, संदीपच्या ‘ॲनिमल’मधील अभिनेत्री तृप्ती डिमरी ही आता प्रभाससोबत ‘स्पिरीट’मध्ये झळकणार आहे. प्रेक्षकांना या जोडीबद्दल उत्सुकता आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Entertainment News
MAHASATTA

🕘 संबंधित बातम्या