🕒 1 min read
मुंबई : “महाराष्ट्रात सरकारच्या संरक्षणाखाली लुट चालू आहे,” असा थेट आरोप शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी मावळचे आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटातील सुनील शेळके यांच्यावर बेकायदेशीर खाण उत्खनन, शासकीय जमिनींचा गैरवापर, आणि हजारो कोटींच्या रॉयल्टी बुडवण्याचे गंभीर आरोप केले आहेत.
राऊत यांनी म्हटलं आहे की, “राज्यात प्रत्यक्षात लुट सुरू आहे. कुंपणच शेत खातंय. भ्रष्ट लोकांना अभय दिलं जातंय. सुनील शेळके यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या आंबळे येथील जमिनी शासकीय खरेदीसाठी पुढे केल्या असून त्या आधीच मोठ्या प्रमाणावर खाणकाम झालेल्या आहेत.”
Sanjay Raut’s letter to Devendra Fadnavis
शेळके कुटुंबीयांकडून काय केलं गेलं?
राऊत यांच्या म्हणण्यानुसार, शेळके आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आंबळे गावातील जवळपास 30 हेक्टर क्षेत्रात बेकायदेशीर उत्खनन केलं असून त्या खाणींमधून १०० फुटांपर्यंत खोल खड्डे निर्माण झाले आहेत. तरीही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) या जमिनी संपादित करत आहे आणि त्याऐवजी शेळके कुटुंबीयांना दुसऱ्या गावातील जमीन दिली जात आहे.
राऊतांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी:
बेकायदेशीर उत्खननातून बुडवलेली रॉयल्टी वसूल करण्यात यावी
इतर शेतकऱ्यांना बदली जमीन का नाही? असा प्रश्न उपस्थित केला
शेळके यांच्यामुळे गावातील रस्त्यांचे नुकसान झालं, त्यांची जबाबदारी कोण घेणार?
MIDC अधिकारी आणि स्थानिक प्रशासन यांच्याविरोधात चौकशीचे आदेश द्यावेत
या प्रकरणी SIT स्थापन करून सखोल तपास सुरू करावा
“शेळकेसारखे आमदार सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून श्रीमंत झाले आहेत. या भ्रष्टाचारात संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई झालीच पाहिजे,” अशी मागणी संजय राऊत यांनी पत्रात केली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘ज्यांच्यावर धनंजय मुंडेंनी आरोप केले, त्यांच्यासोबतचेच फोटो व्हायरल!’ बीडमध्ये राजकीय भूकंप
- ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनचं मौन अखेर सुटलं
- पंचायत फेम अभिनेत्री म्हणते, “सेटवर आम्हाला प्राण्यांसारखी वागणूक”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








