Share

बच्चू कडूंचा सरकारला इशारा: कर्जमाफी नसेल तर वसुली थांबवा, अन्यथा उलटं टांगू!

Bachchu Kadu demands loan waiver, warns govt of protests; 767 farmer suicides in 3 months in Maharashtra.

Published On: 

Bachchu Kadu's warning to the government: If there is no loan waiver, stop the recovery, otherwise we will reverse it!

🕒 1 min read

Bachchu Kadu : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी पुन्हा एकदा आपल्या ठसकेबाज शैलीत सरकारला थेट इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिल माफ करावीत आणि सातबारा (7/12) कोरा करावा, या मागण्यांसाठी आज त्यांनी मुंबईत आंदोलन पुकारलं.

“जोपर्यंत कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत वसुली थांबवा, अन्यथा सरकारला उलटं टांगू,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. याआधी जून महिन्यात त्यांनी मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळी उपोषण केलं होतं.

If there is no loan waiver, stop the recovery, otherwise we will reverse it!

महायुती सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलं होतं. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कडूंची भेट घेऊन समिती स्थापन करून निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर उपोषण मागे घेतलं गेलं. पण अद्याप ठोस निर्णय न झाल्यामुळे 7 जुलैपासून पुन्हा पदयात्रा काढण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे.

दरम्यान, कर्जमाफीच्या मुद्द्यावर 3 जुलै रोजी मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली आहे. महसूलमंत्री खुद्द उपस्थित राहणार आहेत.

शेतकरी आत्महत्या वाढल्या; तीन महिन्यांत 767 शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येचं संकट आणखी गडद झालं आहे. मार्च ते मे 2025 या अवघ्या तीन महिन्यांत 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं राज्य सरकारने मान्य केलं आहे.

या घटनांमध्ये विदर्भ आणि मराठवाडा प्रमुख केंद्रबिंदू ठरले असून लातूर, यवतमाळ, अकोला, बीड, नांदेड आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक आत्महत्या नोंदवल्या गेल्या आहेत.

नापिकी, कर्जबाजारीपणा, विमा भरपाईचा अभाव आणि आर्थिक ताणामुळे शेतकऱ्यांचं जीवन कठीण बनलं आहे. राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी सरकारला तात्काळ पावलं उचलण्याची मागणी केली आहे. विरोधकांनीही निष्क्रियतेवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे.

कृषी विभागानं नवी मदत योजना सुरू करण्याचं आश्वासन दिलं आहे. तसेच आत्महत्येची कारणमीमांसा करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Agriculture News Politics
MAHASATTA

🕘 संबंधित बातम्या