🕒 1 min read
पुणे: वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagwane) आत्महत्या प्रकरणातील आजच्या न्यायालयीन सुनावणीत हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी काही खळबळजनक दावे करत वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी या आरोपांचा तीव्र निषेध केला असून, “सर्व आरोप निराधार आहेत, आरोपी स्वत:चा बचाव करत आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.
या सुनावणीत आरोपी शशांक, लता आणि करिष्मा यांची पोलिस कोठडी एक दिवस वाढवण्यात आली आहे, तर सासरे राजेंद्र आणि सुशील यांची कोठडी ३१ मेपर्यंत वाढवण्यात आली आहे.
Family strongly condemns lawyers’ allegations in Vaishnavi case; Rohini Khadse also angry
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनीही वकिलांच्या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं, “जो त्या वकिलाच्या कानशिलात लावेल, त्याचा मी सत्कार करीन.”
वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी स्पष्ट केलं की, व्हॉट्सअॅप चॅटचे दावे खोटे असून “कोणताही असा संवाद झालेला नाही. वैष्णवीवर कोणताही दोष नाही. ती बळी ठरली आहे,” असं ते म्हणाले. तसेच, पैशांसाठी तिचा छळ झाल्याचाही पुनरुच्चार त्यांनी केला.
काका मोहन कस्पटे यांनीही आरोप फेटाळत “वकिलांकडून दिशाभूल केली जात आहे. चुकीची माहिती मुद्दाम पसरवली जात आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया दिली.
📌 महत्वाच्या बातम्या
- अहिल्यादेवी स्मृतीस्थळाच्या विकासासाठी 681 कोटींचा ऐतिहासिक निर्णय, अजित पवारांच्या नियोजन विभागाची मंजुरी
- ‘डर्टी पीआर गेम्स’च्या आरोपांना दीपिकाचं सडेतोड उत्तर; अप्रत्यक्षपणे संदीप वांगावर निशाणा
- RCBचा ऐतिहासिक विजय! विराट कोहलीचं जल्लोषात सेलिब्रेशन, क्वालिफायरमध्ये थेट प्रवेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





