Share

अहिल्यादेवी स्मृतीस्थळाच्या विकासासाठी 681 कोटींचा ऐतिहासिक निर्णय, अजित पवारांच्या नियोजन विभागाची मंजुरी

The Maharashtra government has approved ₹681 crore for the development of Ahilyadevi Holkar’s memorial in Chondi. Ajit Pawar’s planning department has issued the official sanction, with completion deadline set for May 2028.

Published On: 

Historic decision of Rs 681 crore for the development of Ahilyadevi memorial site, approval from Ajit Pawar planning department

🕒 1 min read

चौंडी (अहिल्यानगर) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या जन्मगावी असलेल्या स्मृतीस्थळाचा जतन व विकास करण्यासाठी राज्य सरकारने 681 कोटी 32 लाख रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला आहे. या प्रकल्पाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. शासन निर्णय आजच जारी करण्यात आला.

Historic decision of Rs 681 crore for the development of Ahilyadevi memorial site, approval from Ajit Pawar’s planning department

राज्य सरकारने हे काम 6 मे 2028 पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून, सर्व कामे ऐतिहासिक वास्तूंच्या शैलीचे जतन करत, पुरातत्व आणि इतिहासाची जाण असलेल्या तज्ज्ञांकडूनच केली जाणार आहेत. यासाठी काही प्रकल्प PRASAD आणि स्वदेश दर्शन योजनांमध्येही समाविष्ट करण्यात येणार आहेत.

6 मे 2025 रोजी अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त चौंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक झाली होती. त्याच बैठकीत या स्मारकाच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांत नियोजन विभागाने अंतिम प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
News Politics
MAHASATTA