🕒 1 min read
मुंबई : दिशा सालियन आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या निवेदनानंतर शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. पोलिसांनी स्पष्टपणे सांगितले की, दिशाच्या मृत्यूत कोणताही संशयास्पद प्रकार नव्हता, ती आत्महत्या होती. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला.
दरम्यान, या प्रकरणावरून सातत्याने टीका करणारे राज्याचे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राणेंनी पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे यांची मिमिक्री केली आणि ‘ये चला… चला…’ असे म्हणत त्यांचा आवाज चिडवण्याच्या शैलीत उतरवला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
“Tall like a penguin, walk like a duck and voice like a chicken”
या प्रकारानंतर ठाकरे गटाकडून जोरदार प्रतिक्रिया आली आहे. पक्षाचे नेते अखिल चित्रे यांनी राणेंवर टीका करताना, “उंची पेंग्विनसारखी, चाल बदकासारखी आणि आवाज कोंबडीसारखा किकीक करणारा ‘दिशाहीन’ जुहूचा निब्बर” असे म्हणत बोचरा टोला लगावला.
संपूर्ण प्रकरणावर आणखी वादळी वळण तेव्हा आले, जेव्हा दिशाच्या वडिलांचे वकील निलेश ओझा यांनी उच्च न्यायालयात पुन्हा अपील दाखल केल्याचे सांगितले. पोलिसांनी दिलेले प्रतिज्ञापत्र चुकीचे असल्याचा आरोप करत, संबंधित पोलिस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच, 16 जुलै रोजी पुढील सुनावणीत काही महत्त्वाचे व्हिडिओ आणि पुरावे सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- मैत्रिणीच्या मृत्यूला चारच दिवस… आणि रश्मी देसाईचा ‘फोटोशूट’; नेटकऱ्यांचा संताप
- मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा; पुढील ४८ तास महत्वाचे
- संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र; ‘या’ आमदारावर केले गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








