🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली असताना तिची जवळची मैत्रीण आणि ‘बिग बॉस 13’मधील सहस्पर्धक रश्मी देसाई (Rashami Desai) सोशल मीडियावर ट्रोलिंगच्या भोवऱ्यात अडकली आहे. शेफालीच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिलेली रश्मी, अवघ्या चार दिवसांतच इन्स्टाग्रामवर स्वतःचे हसरे फोटो पोस्ट करताना दिसली. यावरूनच नेटकरी भडकले आहेत.
Just four days after friend’s death… and Rashmi Desai’s ‘photoshoot’
रश्मीने पांढऱ्या शर्ट आणि डेनिममध्ये काढलेले फोटो पोस्ट केले असून त्यामध्ये ती अगदी सहज आणि ग्लॅमरस लूकमध्ये दिसतेय. मात्र या फोटोंवर कमेंट करत अनेकांनी तिला सवाल विचारले आहेत. “दोन दिवसांपूर्वी मैत्रिणीच्या मृत्यूचं दुःख, आणि आता हे? सगळं नाटक आहे का?” असा सवाल एका युजरने विचारला. दुसऱ्याने लिहिलं, “थोडी तरी संवेदनशीलता दाखवा, शेफाली गेली याला चारच दिवस झालेत.”
शेफालीचं निधन २७ जून रोजी रात्री झालं. जेवल्यानंतर ती अचानक अस्वस्थ झाली आणि पती पराग त्यागीने तिला रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शवविच्छेदन अहवाल अद्याप समोर आलेला नाही. काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, शेफाली उपाशी होती आणि रात्री फ्रीजमधील फ्राइड राईस खाल्ल्यानंतर अँटी एजिंग औषध घेतल्यामुळे ती झोपेतच बेजान झाली.
अंबोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, शवविच्छेदन व न्यायवैद्यक तपास सुरू आहे. तिच्या घरातून रक्त व व्हिसेरा नमुने घेतले गेले आहेत. शेफाली अंधेरीच्या लोखंडवाला भागात पतीसोबत राहत होती.
📌 महत्वाच्या बातम्या
- मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा; पुढील ४८ तास महत्वाचे
- संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र; ‘या’ आमदारावर केले गंभीर आरोप
- ‘ज्यांच्यावर धनंजय मुंडेंनी आरोप केले, त्यांच्यासोबतचेच फोटो व्हायरल!’ बीडमध्ये राजकीय भूकंप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





