🕒 1 min read
मुंबई: ज्येष्ठ अभिनेते आणि ‘महाराष्ट्र भूषण’ अशोक सराफ यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आनंद आणि अभिमानाची लाट उसळली आहे. पण त्यांच्या आयुष्यातला आणखी एक खास क्षण घडला, जो अत्यंत भावनिक होता.
पद्मश्री पुरस्कार सोहळ्यानंतर अशोक सराफ दिल्लीहून मुंबईकडे प्रवास करत होते. त्या फ्लाइटमध्येच त्यांच्या भाची अदिती परांजपे पायलट म्हणून कार्यरत होती. विशेष म्हणजे, अदितीने विमानात अशोक सराफ यांच्या गौरवाबद्दल खास अनाउन्समेंट केली, ज्यामुळे संपूर्ण फ्लाइटमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला आणि अशोक सराफ भावूक झाले.
Pilot’s niece makes surprise announcement for Padma Shri Ashok Saraf; applause on the plane!
अदिती परांजपे म्हणाली, “आजचं उड्डाण माझ्यासाठी अत्यंत खास आहे कारण माझे काका अशोक सराफ आपल्यासोबत प्रवास करत आहेत. त्यांना नुकताच भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं आहे. माझ्यासाठी हा आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण आहे.”
या खास क्षणी सर्व प्रवाशांनी टाळ्यांच्या गजरात अशोक सराफ यांचं अभिनंदन केलं. अशोक सराफ यांनी हात जोडून सर्वांचे आभार मानले. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडीओ खुद्द अशोक सराफ यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी पित नाही”; संजय राऊतांचा सुप्रिया सुळेंना टोला
- वैष्णवी प्रकरणात वकिलांच्या आरोपांचा कुटुंबीयांकडून जोरदार निषेध; रोहिणी खडसेही संतापल्या
- ‘डर्टी पीआर गेम्स’च्या आरोपांना दीपिकाचं सडेतोड उत्तर; अप्रत्यक्षपणे संदीप वांगावर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





