🕒 1 min read
मुंबई : राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून, मुंबईसह (mumbai) कोकण किनारपट्टीवर येत्या ४८ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः २ आणि ३ जुलै रोजी मुंबईत ९० ते १२० मिमीपर्यंत पावसाची शक्यता आहे.
दक्षिणेकडील कमी दाबाचा पट्टा मध्य प्रदेशाच्या दिशेने सरकत आहे. यामुळे किनारपट्टीवर आर्द्रता आणि वाऱ्याचा जोर वाढत आहे. याचा परिणाम म्हणून, मुंबईच्या उत्तर उपनगरांमध्ये – बोरिवली, कांदिवली, मालाड, दहिसर तुलनेत अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दक्षिण मुंबईत मात्र पावसाचा जोर कमी राहील.
Heavy rain warning in Konkan including Mumbai
याचदरम्यान, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच घाटमाथ्यांवर – नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पूर्वेकडील कमी दाबाचा क्षेत्र झारखंडच्या दिशेने सरकत असून, ते मध्य भारतात प्रवेश करण्याची शक्यता आहे. या प्रणालीमुळे महाराष्ट्रातील विविध भागांवर परिणाम होईल. विशेषतः विदर्भात – नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा आहे.
हवामान विभागाने जुलै महिन्यासाठी संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र; ‘या’ आमदारावर केले गंभीर आरोप
- ‘ज्यांच्यावर धनंजय मुंडेंनी आरोप केले, त्यांच्यासोबतचेच फोटो व्हायरल!’ बीडमध्ये राजकीय भूकंप
- ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनचं मौन अखेर सुटलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





