Share

“फॉर्च्युनर नाही दिली तर गाडी पेटवीन”, शशांकवर वैष्णवीच्या वडिलांचा गंभीर आरोप

Vaishnavi Hagawane father accuses Shashank of threatening to burn a car if not given a Fortuner. He denies claims of owning luxury cars and says dowry demands forced the marriage.

Published On: 

"If I don't give you a Fortuner, I will set the car on fire", Vaishnavi's father makes a serious allegation against Shashank

🕒 1 min read

वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) मृत्यू प्रकरणात सुरू असलेल्या न्यायालयीन सुनावणीदरम्यान वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. शशांक हगवणे याने फॉर्च्युनर गाडीच्या मागणीवरून दबाव टाकल्याचा आणि एमजी हेक्टर गाडी नाकारल्याचा दावा त्यांनी केला आहे.

अनिल कस्पटे यांनी स्पष्ट केलं की, “मला फक्त फॉर्च्युनर पाहिजे, एमजी हेक्टर दिली तर ती तिथेच पेटवून देईन”, असे शशांकने स्पष्ट शब्दात सांगितल्याचं त्यांनी कोर्टात नमूद केलं. त्यामुळेच लग्नात फॉर्च्युनर गाडी देण्यास ते बाध्य झाल्याचं त्यांनी सांगितलं.

“If I don’t give you a Fortuner, I will set the car on fire”, Vaishnavi’s father makes a serious allegation against Shashank

हगवणे कुटुंबाकडून 5 कोटींच्या गाड्यांचा दावा करण्यात आला असला तरी, त्यांच्याकडे प्रत्यक्षात एकच गाडी असून तीही दुसऱ्याच्या नावावर असल्याचा आरोप कस्पटे यांनी केला. त्यांनी सांगितले की, “फोर्ड गाडी ही चंद्रकांत बुचडे नावाच्या इसमाच्या नावावर असून, ती सध्या पोलीस ठाण्यात उभी आहे.”

तसंच, “मी गाडी स्वेच्छेने दिली नाही, तर ती मागितली गेली होती”, असा आरोप करत, या विवाहासाठी गाडी, सोने, चांदी यांचीही मागणी झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. “आधीच माझ्या मुलीची दोन लग्न मोडली होती, त्यामुळे हा विवाह जबरदस्तीने करावा लागला”, अशी भावना कस्पटे यांनी व्यक्त केली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
News Politics
MAHASATTA