🕒 1 min read
पुणे : वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) आत्महत्या प्रकरणात तिचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे या तिघांना शिवाजीनगर न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. काल एका दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर आज न्यायालयाने हा महत्त्वाचा निर्णय दिला.
सुनावणी दरम्यान पोलीस तपासात आवश्यक माहिती मिळाल्यामुळे आता न्यायालयीन कोठडी दिली असून, पुढील चौकशीसाठी गरज वाटल्यास पोलीस पुन्हा कोठडी मागू शकतात. तिन्ही आरोपींना आता येरवडा कारागृहात हलवण्यात येणार आहे.
Vaishnavi Hagavane suicide case: Husband Shashank, mother-in-law and daughter-in-law sent to 14-day judicial custody
या प्रकरणात आणखी एक महत्वाची घटना म्हणजे, फरार आरोपी निलेश चव्हाणला पकडल्याची बनावट माहिती देणाऱ्या संतोष गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याने फोन करून तपासाला दिशाभूल केली होती.
वैष्णवीच्या वडील अनिल कस्पटे यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, शशांकने फॉर्च्युनर गाडी दिली नाही तर एमजी हेक्टर गाडी पेटवून देण्याची धमकी दिली होती. त्यामुळे त्यांनी जबरदस्तीने ही गाडी दिली. त्यांनी सांगितले की, हगवणे कुटुंबाकडून सोनं, चांदी, गाडी यांची मागणी होत होती आणि यामुळेच वैष्णवीवर मानसिक ताण निर्माण झाला होता.
त्यांनी पुढे सांगितलं की, त्यांच्या मुलीचं हे तिसरं लग्न होतं आणि यापूर्वी दोन वेळा तिचं लग्न मोडलं होतं. या प्रकरणात निलेश चव्हाणही सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “फॉर्च्युनर नाही दिली तर गाडी पेटवीन”, शशांकवर वैष्णवीच्या वडिलांचा गंभीर आरोप
- लाडकींच्या हप्त्यासाठी आदिवासी विकास खात्याच्या निधीवर डल्ला! मंत्री अशोक उईके म्हणाले…
- पद्मश्री अशोक सराफांसाठी पायलट भाचीची सरप्राइज अनाउन्समेंट; विमानात टाळ्यांचा कडकडाट!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





