Share

लाडकींच्या हप्त्यासाठी आदिवासी विकास खात्याच्या निधीवर डल्ला! मंत्री अशोक उईके म्हणाले…

After ₹335 crore from Tribal Department was redirected to Ladki Bahin Yojana, Minister Ashok Uike clarifies that tribal welfare schemes will continue without disruption, with a larger budget allocated this year.

Published On: 

Tribal Development Department funds for Ladki installments are being cut! Minister Ashok Uike said...

🕒 1 min read

राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी ‘लाडकी बहिण’ योजनेसाठी पुन्हा एकदा आदिवासी विकास विभागाचा 335 कोटी 70 लाखांचा निधी वळवण्यात आल्याची माहिती पुढे आल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके (Ashok Uike) यांनी आपल्या पहिल्या प्रतिक्रियेत या निर्णयाचे समर्थन करत आदिवासी विभागाच्या योजना पूर्ववत राबवल्या जातील याची ग्वाही दिली आहे.

मंत्री अशोक उईकेंनी स्पष्ट केलं की, गेल्या वर्षी विभागाला 17,080 कोटींचा निधी मिळाला होता, यंदा तो 21,500 कोटींवर पोहोचला आहे, त्यामुळे आदिवासी योजनांना निधीअभावी कोणतीही अडचण येणार नाही. तसेच, केंद्र सरकारकडूनही आवश्यक ते सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

Tribal Development Department funds for Ladki installments are being cut! Minister Ashok Uike said…

लाडकी बहिण ही महत्त्वाकांक्षी योजना असून, तिची अंमलबजावणी करणं ही सरकारची सामूहिक जबाबदारी आहे, असं उईके म्हणाले. “आमचा निधी वळवून घेतला जातोय हा अपप्रचार असून तो थांबवायला हवा,” असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.

दरम्यान, मे महिन्याच्या हप्त्यासाठी महिलांच्या खात्यात रक्कम लवकरच जमा केली जाणार असून, यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) देखील काढण्यात आला आहे. मात्र, राज्याच्या तिजोरीवर होणाऱ्या भारामुळे सरकारकडून नियमित हप्ते देताना आर्थिक गणित सांभाळावं लागत असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळते.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
News Politics
MAHASATTA