Share

“ठाकरे बंधूंवर डोमकावळे कावकाव करतायत”, राऊतांचा सरकारला टोला

Sanjay Raut backs Raj-Uddhav protest against Hindi policy; calls out govt with sharp remarks.

Published On: 

"The Thackeray brothers are being scolded by the domkawals", Raut slams the government

🕒 1 min read

मुंबई : हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र येत असल्याच्या पार्श्वभूमीवर, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारवर घणाघात केला आहे. “राज आणि उद्धव ठाकरेंच्या (Raj-Uddhav Thackeray) एकत्र येण्यावर काही डोमकावळे सतत कावकाव करत आहेत,” असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना लक्ष्य केलं.

राज्य सरकारने शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय घेतल्यावर विरोध वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ५ जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वात हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चा निघणार आहे.

“The Thackeray brothers are being scolded by the domkawals”

याच मोर्च्यावर बोलताना राऊत म्हणाले, “जर या आंदोलनामुळे सरकारने हिंदी सक्ती मागे घेतली, तर आम्ही त्यांचं स्वागत करू. शेवटी लोकभावनांसमोर सरकारला झुकावं लागतं.”

आज आझाद मैदानात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचं बैठक असून, शासन निर्णयाच्या विरोधात भूमिका ठरवली जाणार आहे. राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं की, “राज आणि उद्धव यांनी एकत्र येणं हेच सगळं सांगून जातं. याला ‘बिटवीन द लाईन्स’ म्हणतात.”

शासनाच्या निर्णयावर टीका करत राऊत म्हणाले, “पूर्वीचा आदेश असताना नवीन निर्णय का? तेव्हा हे सरकार झोपलं होतं का? मी शासनात नसलो तरी शासन कसं चालतं ते मला माहीत आहे.”

ठाकरे बंधूंचा मोर्चा म्हणजे संभाव्य राजकीय युतीचा संकेत आहे का, या प्रश्नावर राऊत म्हणाले, “ही युती नाही, तर मराठी माणसाच्या एकतेची सुरुवात आहे. जे कार्य बाळासाहेब ठाकरे यांनी केलं, त्यावर भाजपकडून तडे दिले गेले. आता मराठी समाज एकत्र येतोय, त्याचं स्वागत व्हायला हवं.”

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
News Politics
MAHASATTA

🕘 संबंधित बातम्या