Share

अखेर आनंदाचा दिवस आला! ‘बिग बॉस मराठी’ फेम सूरज चव्हाणचा झाला साखरपुडा? पण…..

Suraj Chavan shared a video of his engagement that went viral, but it turned out to be a dream. Watch how fans reacted to the fun twist!

Published On: 

Finally, the day of joy has come! 'Bigg Boss Marathi' fame Suraj Chavan got engaged? But.....

🕒 1 min read

मुंबई : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाण (Suraj Chavan) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण, त्याने शेअर केलेला एक साखरपुड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. परंतु, या व्हिडिओमागे खरी गोष्ट थोडी वेगळी आहे!

सूरजने इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केली असून, त्यामध्ये तो स्टायलिश लूकमध्ये एका मुलीच्या घरी जाताना दिसतो. तिचं कौतुकात स्वागत केलं जातं, आणि सूरज तिच्या बोटात अंगठी घालतो. यामुळे अनेक चाहत्यांना वाटले की सूरजने खरोखरच साखरपुडा केला आहे.

‘Bigg Boss Marathi’ fame Suraj Chavan got engaged?

मात्र, या व्हिडिओच्या शेवटी ट्विस्ट आहे. ही सगळी घटना सूरजचं स्वप्न असते! सूरजची बहीण त्याला झोपेतून उठवते आणि तो म्हणतो, “झोपूदे की, भारी स्वप्न पडलेलं!”

या मजेशीर व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “Congratulations करणार होतो, तेवढ्यात धोका झाला!”, “गुलिगत धोका!” अशा प्रतिक्रिया मिळाल्या. काहींनी तर भावना व्यक्त करत लिहिलं की, “सूरज, अभिनंदन टाईप केलं होतं, पण तू शेवटी धोका दिलास!”

सूरज चव्हाणचा हा मजेशीर व्हिडिओ चाहत्यांमध्ये आनंदाचा विषय ठरला असून, सोशल मीडियावर त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Entertainment News
MAHASATTA