🕒 1 min read
अहमदाबाद : आयपीएल 2025 च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सवर 20 धावांनी विजय मिळवत क्वालिफायर 2 (Qualifier 2) मध्ये दमदार प्रवेश केला आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईने 229 धावांचं लक्ष्य दिलं. मात्र गुजरात 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून केवळ 208 धावा करू शकली.
साई सुदर्शनने एकहाती झुंज दिली
गुजरातकडून साई सुदर्शनने 49 चेंडूंमध्ये 80 धावांची शानदार खेळी करत विजयाची आशा जिवंत ठेवली होती. त्याला वॉशिंग्टन सुंदरची 48 धावांची साथ मिळाली. दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली. मात्र जसप्रीत बुमराहने वॉशिंग्टनला बोल्ड करत जोडी फोडली आणि मुंबईला सामन्यात परत आणलं.
GT vs MI: Mumbai Indians enter Qualifier 2
गुजरातची अडखळती फलंदाजी
गुजरातची सुरुवातच खराब झाली. ट्रेंट बोल्टने पहिल्याच ओव्हरमध्ये कर्णधार शुभमन गिलला अवघ्या 1 धावेवर बाद केलं. त्यानंतर कुसल मेंडीस (20) हिट विकेट झाला. साई सुदर्शनने झुंज दिली पण रिचर्ड ग्लीसनने त्याला बोल्ड करत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
मुंबईकडून गोलंदाजीचा परफेक्ट प्लॅन
मुंबईकडून ट्रेंट बोल्टने 2 विकेट्स घेतल्या, तर बुमराह, ग्लीसन, सँटनर आणि अश्विनी कुमार यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. या विजयामुळे मुंबईने साखळी फेरीतील दोन्ही पराभवांचा हिशोब चुकता केला.
क्वालिफायर 2 मध्ये मुंबई विरुद्ध पंजाब
आता मुंबईचा सामना 1 जून रोजी क्वालिफायर 2 मध्ये पंजाब किंग्जशी होणार आहे. या सामन्याचा विजेता संघ अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी भिडणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- June Bank Holidays 2025 : जूनमध्ये बँका किती दिवस राहणार बंद? जाणून घ्या सुट्ट्यांची यादी
- सुप्रिया ताई परदेशातून आल्यानंतर स्पष्टता येईल; राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर रोहित पवारांचं सूचक वक्तव्य
- मोदी झोपत नाहीत, थकत नाहीत; भाजपने निवृत्तीचं वय 85 करावं; कैलाशानंद गिरींचा भाजपला सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now






