🕒 1 min read
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2026 ची अधिकृत सुरुवात 31 ऑक्टोबर 2026 रोजी नाशिकच्या (Nashik Kumbh Mela 2026) रामकुंडावर ध्वजारोहणाने होणार आहे. हा कुंभमेळा 24 जुलै 2028 पर्यंत सुरू राहणार असून, यात एकूण 42 ते 45 पर्वस्नानांचा समावेश असणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि 13 आखाड्यांचे महंत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नाशिक व त्र्यंबकेश्वरमधील (Trimbakeshwar) शाही स्नानाच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या.
Nashik Kumbh Mela: First ‘Royal Bath’ on this day
शाही स्नानाच्या प्रमुख तारखा पुढीलप्रमाणे:
2 ऑगस्ट 2027 – सोमवती अमावस्या (पहिले शाही स्नान)
31 ऑगस्ट 2027 – श्रावण वद्य अमावस्या (महाकुंभ स्नान)
11 सप्टेंबर 2027 – भाद्रपद शुद्ध एकादशी (अमृत स्नान)
याशिवाय, 24 जुलै 2027 रोजी आषाढ कृष्ण पंचमीला आखाड्याचे ध्वजारोहण होईल आणि 29 जुलै 2027 रोजी एकादशीच्या दिवशी नगर प्रदक्षिणा पार पडेल.
ग्रहस्थितीच्या आधारे महत्त्वाचा दिवस म्हणजे 31 ऑगस्ट 2027, या दिवशी सूर्य, चंद्र व गुरू सिंह राशीत असतील, ज्यामुळे महाकुंभ स्नानाला विशेष महत्त्व आहे.
यंदाचा कुंभ वक्री कुंभ असून त्यामध्ये गुरू ग्रह सिंह, कर्क आणि कन्या राशीत भ्रमण करणार आहे. गुरूचे राशीप्रवेश पुढीलप्रमाणे आहेत:
31/10/2026 – सिंह राशीत प्रवेश
24/1/2027 – कर्क राशीत वक्री प्रवेश
25/6/2027 – पुन्हा सिंह राशीत
26/11/2027 – कन्या राशीत
28/2/2028 – पुन्हा सिंह राशीत
24/7/2028 – पुन्हा कन्या राशीत प्रवेश
या कुंभमेळ्यात धार्मिक विधी, शाही स्नान, आखाड्यांचे मिरवणूक आणि लाखो भाविकांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- अखेर आनंदाचा दिवस आला! ‘बिग बॉस मराठी’ फेम सूरज चव्हाणचा झाला साखरपुडा? पण…..
- एकाच झटक्यात राष्ट्रवादी फुटली! 7 आमदारांनी सोडली अजितदादांची साथ
- June Bank Holidays 2025 : जूनमध्ये बँका किती दिवस राहणार बंद? जाणून घ्या सुट्ट्यांची यादी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





