Share

IPL 2025: मुंबई इंडियन्सचा दणदणीत विजय, टॉप-4 मध्ये जागा निश्चित! दिल्ली स्पर्धेबाहेर

Mumbai Indians have sealed their spot in IPL 2025 playoffs after defeating Delhi Capitals by 59 runs. Suryakumar Yadav starred with an unbeaten 73 while Delhi collapsed for 121.

Published On: 

Mumbai Indians have sealed their spot in IPL 2025 playoffs after defeating Delhi Capitals by 59 runs. Suryakumar Yadav starred with an unbeaten 73 while Delhi collapsed for 121.

🕒 1 min read

मुंबई | प्रतिनिधी: IPL 2025 च्या महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 59 धावांनी पराभव करत प्लेऑफमध्ये आपली जागा पक्की केली आहे. याच पराभवामुळे दिल्लीचे आव्हान संपुष्टात आले आहे. सामन्यात सूर्यकुमार यादव आणि नमन धीर यांनी शेवटच्या षटकांत तुफान फटकेबाजी करत 180 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात दिल्लीचा डाव केवळ 121 धावांत आटोपला.

IPL 2025 Playoffs: Mumbai Beats Delhi by 59 Runs

शेवटच्या दोन षटकांत 48 धावा, सूर्यकुमारचा दणका

मुंबईची सुरुवात खराब झाली होती. रोहित शर्मा अवघ्या 5 धावांवर बाद झाला. मात्र सूर्यकुमार यादव (नाबाद 73) आणि नमन धीर (नाबाद 24) यांनी शेवटच्या दोन षटकांत 48 धावा फटकावत सामना फिरवला. तिलक वर्मानेही उपयुक्त 27 धावा केल्या. मुंबईने 5 गडी गमावून 180 धावा केल्या.

दिल्लीचा डाव कोसळला, प्लेऑफचे स्वप्न भंगले

दिल्लीकडून सुरुवातीलाच प्रमुख फलंदाज बाद होत गेले. दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, आणि जसप्रीत बुमराह यांनी दिल्लीच्या डावाला उध्वस्त केले. समीर रिझवीने 39 धावा केल्या पण एकाकी झुंज अपुरी ठरली. संपूर्ण संघ 121 धावांत बाद झाला. गुजरात टायटन्स, आरसीबी आणि पंजाब किंग्जनंतर मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये प्रवेश केला. दिल्ली मात्र पराभवामुळे स्पर्धेबाहेर गेली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
News Sports
MAHASATTA

Leave a Comment

🕘 संबंधित बातम्या