Share

मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडले 47 विषारी साप; सुरक्षा रक्षकही हादरले

Shocking case at Mumbai Airport: Customs officers found 47 venomous snakes and 5 turtles in a passenger’s bag arriving from Thailand. Case filed under wildlife protection laws.

Published On: 

47 poisonous snakes found in passenger's bag at Mumbai airport; Security guards also shocked

🕒 1 min read

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai Airport) सोमवारी एक धक्कादायक प्रकार समोर आला. थायलंडहून आलेल्या एका भारतीय प्रवाशाच्या बॅगेतून सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी ४७ विषारी साप आणि ५ कासव जप्त केले. या प्रकरणामुळे विमानतळावरील सुरक्षा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सीमाशुल्क अधिकाऱ्यांना प्रवाशाच्या वागणुकीवर संशय आला होता, त्यामुळे त्याची बॅग तपासण्यात आली. तपासणीदरम्यान त्यात स्पायडर टेल्ड हॉर्नड वायपर, इंडोनेशियन पिट वायपर आणि एशियन लीफ टर्टल अशा विविध प्रजातींचे साप व कासव आढळले.

47 poisonous snakes found in passenger’s bag at Mumbai airport

RAW (ResQink Association for Wildlife Welfare) या संस्थेच्या मदतीने या प्रजातींची ओळख पटवण्यात आली. हे सर्व प्राणी भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षित असून त्यांची आयात बंदी घालण्यात आलेली आहे. साप आणि कासवांना मूळ देशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरु आहे.

या प्रकरणी प्रवाशावर वन्यजीव तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरु आहे. कस्टम विभागाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर जप्त करण्यात आलेल्या सापांचे फोटो देखील प्रसिद्ध केले आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
News
MAHASATTA