🕒 1 min read
Maharashtra Rain : राज्यात सध्या काही भागांमध्ये पावसाचा जोर ओसरला आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या म्हणण्यानुसार पुढील दोन दिवस (३ व ४ जून) राज्याच्या ८० टक्के भागांमध्ये उघडं वातावरण राहील. उर्वरित २० टक्के भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.
खान्देश आणि विदर्भातदेखील उघडं वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषतः सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि कोकण परिसरात अधूनमधून अशाच वातावरणाचा अनुभव येत राहील.
Rain will fall in this district of Maharashtra for the next 2 days
पंजाबराव डखांनी सांगितल्याप्रमाणे, खरा मान्सून १५ जूनपासून सक्रीय होण्याची शक्यता आहे. त्या दरम्यान दररोज राज्याच्या सुमारे ४५ टक्के भागांत पावसाची हजेरी लागेल. त्यामुळे सर्वत्र एकदम पाऊस पडेल, अशी शक्यता नाही.
शेतकऱ्यांना डख यांचा सल्ला आहे की, पेरण्या करण्यासाठी घाई करू नये. १४ जूनपर्यंत हवामानात बदल होत राहील व पाऊस केवळ काही भागातच पडेल. त्यामुळे कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांनी हवामान पूर्णपणे स्थिर होईपर्यंत प्रतीक्षा करावी.
📌 महत्वाच्या बातम्या
- IPL 2025: पंजाब किंग्सचा ऐतिहासिक विजय, मुंबई इंडियन्सला हरवून रचले अनेक विक्रम
- संतापजनक आणि धक्कादायक! परळी वैद्यनाथ मंदिराच्या नवीन दर्शन मंडपातच शिजवले मटण
- Nashik Kumbh Mela : या दिवशी पहिले ‘शाही स्नान’; 31 ऑक्टोबरपासून कुंभमेळा पर्वाला होणार सुरुवात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





