🕒 1 min read
Rohit Pawar on NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, या चर्चांना वेग आला असतानाच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, “तुम्हाला जसा प्रश्न पडतो आहे, तसाच आम्हालाही आहे. पण अद्याप फक्त चर्चा सुरु आहे. आम्हाला काहीही सांगण्यात आलेलं नाही.”
Rohit Pawar’s suggestive statement on talks of NCP coming together
रोहित पवार पुढे म्हणाले, “जर काही ठोस घडलं, तर आम्ही स्वतःच जाहीर करू. सध्या पक्षाची जबाबदारी सुप्रिया ताईंकडे आहे. त्या सध्या परदेशात असून, परत आल्यावरच त्या यावर भूमिका स्पष्ट करतील.”
याशिवाय संजय राऊत यांनी केलेल्या ‘गढूळ पाणी’ टिप्पणीवर रोहित पवार म्हणाले की, “चर्चा नसलेल्या गोष्टींना नावं लावू नका. भाजपवर टीका करा, पण राष्ट्रवादीसारख्या पक्षावर अशा शब्दांत बोलू नका.”
📌 महत्वाच्या बातम्या
- June Bank Holidays 2025 : जूनमध्ये बँका किती दिवस राहणार बंद? जाणून घ्या सुट्ट्यांची यादी
- सुप्रिया ताई परदेशातून आल्यानंतर स्पष्टता येईल; राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर रोहित पवारांचं सूचक वक्तव्य
- मोदी झोपत नाहीत, थकत नाहीत; भाजपने निवृत्तीचं वय 85 करावं; कैलाशानंद गिरींचा भाजपला सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








