🕒 1 min read
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी (Kailashanand Giri) यांनी भाजपला आपल्या पक्षघटनेत बदल करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, मोदी झोपत नाहीत, थकत नाहीत आणि संपूर्ण देशासाठी निष्ठेने काम करत आहेत. त्यामुळे मोदीसारख्या नेतृत्वाची देशाला पुढेही गरज आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने नेत्यांची निवृत्तीवयाची मर्यादा 75 वर्षांवरून 85 वर्षांपर्यंत वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली.
बिहारच्या जमुई जिल्ह्यातील सिमुलतला आश्रमात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं. तसेच त्यांनी नेपाळमध्ये वाढणाऱ्या चीनच्या प्रभावाबाबतही चिंता व्यक्त केली. “नेपाळ हिंदू राष्ट्र आहे. भारताने नेपाळच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, अन्यथा चीनचा प्रभाव घातक ठरू शकतो,” असेही त्यांनी सांगितले.
Kailashanand Giri advice to BJP
पाकिस्तानच्या दहशतवादासंदर्भात ते म्हणाले की, “जर पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणे थांबवले नाही, तर भारताने पुन्हा कठोर कारवाई करावी.”
कैलाशानंद गिरी यांनी भारताला “हिंदू राष्ट्र” घोषित करण्याची मागणी करत, देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’ म्हणणे बंधनकारक व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- सुप्रिया ताई परदेशातून आल्यानंतर स्पष्टता येईल; राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर रोहित पवारांचं सूचक वक्तव्य
- मोदी झोपत नाहीत, थकत नाहीत; भाजपने निवृत्तीचं वय 85 करावं; कैलाशानंद गिरींचा भाजपला सल्ला
- चीन-पाकिस्तान, भाई-भाई! चीन करणार पाकिस्तानला मदत, ड्रॅगन देणार 3.7 अब्ज डॉलर्स कर्ज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





