Share

“कदाचित फोन झाले असतील!”; राज-उद्धव पुन्हा एकत्र? संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Sanjay Raut hints Raj Uddhav Thackeray may have spoken; political unity talks gain momentum in Maharashtra.

Published On: 

"Maybe there were phone calls!"; Raj-Uddhav together again? Sanjay Raut's statement sparks discussions

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संभाव्य युतीबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. हे दोन भाऊ पुन्हा एकत्र येणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

गेल्या काही दिवसांत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जिथे-जिथे संपर्क झाला तिथे मनोमिलन घडताना दिसत आहे. नाशिकमध्येही असाच प्रसंग पाहायला मिळाला. त्यातच संजय राऊत यांच्या ‘कदाचित फोन झाले असतील’ या सूचक वक्तव्यामुळे चर्चांना अधिकच धार आली आहे.

“Maybe there were phone calls!”; Raj-Uddhav together again?

राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “आम्ही सकारात्मक आहोत. माननीय राज ठाकरेही सकारात्मक आहेत. उद्धव ठाकरेही सकारात्मक आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोमिलन होत असेल तर त्यात नवल काय?”

तसेच ते पुढे म्हणाले, “फळ दिसावं असं वाटतंय ना तुम्हाला? मग लक्षात ठेवा, झाडाला फळ येण्याआधी बियाणं टाकावं लागतं, पाणी घालावं लागतं, रोपटं फुलवावं लागतं. ही प्रक्रिया सुरू झाली आहे. थोड्याच दिवसांत फळं दिसतील.”

दरम्यान, अमित ठाकरे यांनीही “राजसाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत. दोन भावांनी बोलावं, आम्ही बोलून काही फरक पडत नाही,” असं स्पष्ट केलं. यावर राऊत म्हणाले, “कदाचित फोन झाले सुद्धा असतील!”

एक गंमतीशीर वळण देताना त्यांनी असंही म्हटलं की, “अमितने कॅफेत बोलावलंय. पण आमच्यासाठी तो कॅफे नाही, दुसरं घरच आहे. आदित्यप्रमाणेच अमितही गोड आणि समजूतदार आहे. दोघांची भूमिका सकारात्मक आहे.”

एकंदरीत, राजकीय वादाचे वावटळ आता सौहार्दाच्या झुळुकीकडे वळते की काय, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
News Politics
MAHASATTA

🕘 संबंधित बातम्या