🕒 1 min read
बंगळुरू : IPL 2025 च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्सवर 6 धावांनी विजय मिळवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) 18 वर्षांची प्रतीक्षा संपवली. हा ऐतिहासिक विजय साजरा करण्यासाठी एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांचा प्रचंड जल्लोष होता. मात्र या आनंदाच्या क्षणात दु:खद घटना घडली, चेंगराचेंगरीमुळे 11 चाहत्यांचा मृत्यू झाला.
RCB’s historic victory, but the stampede was a disappointment
या दुर्घटनेनंतर आरसीबीकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं. संघाने आपल्या निवेदनात मृतांच्या कुटुंबियांसाठी शोक व्यक्त करत सुरक्षिततेचं आवाहन केलं. संघाचं म्हणणं आहे की, “प्रत्येक चाहत्याची सुरक्षितता आमच्यासाठी सर्वोच्च आहे.” आरसीबीने कार्यक्रमात तातडीने बदल करून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन केलं असल्याचंही स्पष्ट केलं.
तरीही काही गंभीर प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत. मृत चाहत्यांच्या कुटुंबियांना मदत केली जाणार का? जबाबदारी कोणाची? आणि ही चूक न करणाऱ्या चाहत्यांनी आपला जीव का गमावावा?
आरसीबीने शेवटी एक भावनिक संदेश दिला – “Please stay safe.”
📌 महत्वाच्या बातम्या
- “माझा क्रिकेटचा प्रवास इथपर्यंतच…” भारतातील ह्या खेळाडूने घेतली अचानक निवृत्ती?
- मराठा समाजाची लग्नासाठीची एक नवी आचारसंहिता, हुंडा घेणाऱ्यांशी आता….
- आदित्य ठाकरेंनी आपले आडनाव बदलून “खान” किंवा “शेख” करावे; नितेश राणेंची जोरदार टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





