🕒 1 min read
मुंबई : नागपूर ते मुंबई (Nagpur to Mumbai Expressway) जोडणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा (Samruddhi Mahamarg) शेवटचा 76 किमी लांबीचा टप्पा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आला. इगतपुरी ते आमणे दरम्यानचा हा टप्पा सुरू झाल्याने आता संपूर्ण 701 किमीचा समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी खुला झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 डिसेंबर 2022 रोजी नागपूर ते शिर्डी (520 किमी) या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे (शिर्डी-भरवीर, 80 किमी) आणि दादा भुसे (भरवीर-इगतपुरी, 25 किमी) यांच्या हस्ते दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झाले. आता फडणवीस यांच्या हस्ते चौथ्या टप्प्याचे उद्घाटन झाल्याने नागपूर ते मुंबई प्रवास सुलभ झाला आहे.
Nagpur-Mumbai Samruddhi Highway nears completion
या 76 किमी टप्प्यात 5 बोगदे असून, त्यातील 8 किमीचा सर्वात लांब बोगदा इगतपुरीजवळ आहे. या महामार्गामुळे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी ते कसारा हे अंतर अवघ्या 8 मिनिटांत पार करता येणार आहे.
हा महामार्ग महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांना जोडतो. 120 किमी प्रतितास वेगाने प्रवासाची क्षमता, 11.5 लाख वृक्ष लागवड, 3 आंतरराष्ट्रीय विमानतळे, 48 लहान बंदरे आणि 6000 किमी रेल्वे नेटवर्कशी जोडणी ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. भारतातील पहिला पर्यावरणपूरक महामार्ग म्हणून याकडे पाहिले जात आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- RCB चा ऐतिहासिक विजय, पण चेंगराचेंगरीनं साजऱ्या क्षणांवर विरजण; संघाची पहिली प्रतिक्रिया
- “माझा क्रिकेटचा प्रवास इथपर्यंतच…” भारतातील ह्या खेळाडूने घेतली अचानक निवृत्ती?
- मराठा समाजाची लग्नासाठीची एक नवी आचारसंहिता, हुंडा घेणाऱ्यांशी आता….
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now







