Share

उद्धव ठाकरे थेट मैदानात! मनसेसोबत युती?; ‘बातमीच देतो’ म्हणत चर्चेला वेग

Uddhav Thackeray hints at a major political move, refuses hints, says “Will give news soon” amid MNS alliance buzz.

Published On: 

Uddhav Thackeray directly enters the field! Alliance with MNS?; 'I will give you the news', says discussion

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पुन्हा एकदा शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युतीच्या (MNS alliance) चर्चांना उधाण आले आहे. यावरच प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे . “महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे, तेच होणार. आता कोणतेही संकेत नाहीत, थेट बातमीच देणार.”

ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं की त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नाही. “आपल्या शिवसैनिकांच्या मनातही संभ्रम नाही,” असं ते म्हणाले. या वक्तव्यामुळे युतीच्या शक्यतेकडे आणखी एक पाऊल पडल्याचं बोललं जात आहे.

Uddhav Thackeray directly enters the field! Alliance with MNS?

दरम्यान, मनसेने यापूर्वी स्पष्ट केलं होतं की अद्याप युतीसंबंधी कोणताही ठोस प्रस्ताव त्यांच्याकडे आलेला नाही. “युतीची चर्चा कॅमेरासमोर होत नाही,” असं मनसेचे नेते म्हणाले होते. 2014 आणि 2017 मध्येही अशीच चर्चा रंगली होती, पण काहीच घडलं नव्हतं, त्यामुळे “ताक फुंकून प्यावी लागते,” अशी प्रतिक्रिया मनसेकडून आली होती.

उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर मनसेकडूनही प्रतिक्रिया आली आहे. संदीप देशपांडे यांनी सांगितलं की, “उद्धव ठाकरे काय बातमी देतात, याची आम्ही वाट पाहत आहोत.” मात्र, त्यांनी वैभव दवळी या माजी मनसे कार्यकर्त्याच्या प्रवेशावर नाराजी व्यक्त केली. “2014 सालीच त्याला पक्षातून काढलं होतं. तो आमचा कार्यकर्ता नव्हता,” असंही देशपांडे यांनी स्पष्ट केलं.

राजकीय पातळीवर या चर्चेला वेग येत असताना, आगामी काही दिवसांत ठाकरे गटाकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
News Politics
MAHASATTA

🕘 संबंधित बातम्या