Share

लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! लाडक्या बहिणींना मिळणार 1 लाखांपर्यंत कर्ज, तेही शून्य टक्के व्याजदराने

Women in Mumbai can now get up to ₹1 lakh loan at zero interest under the Ladki Bahin scheme via Mumbai Bank.

Published On: 

Good news for dear sisters! Dear sisters will get a loan of up to 1 lakh, that too at zero percent interest rate

🕒 1 min read

मुंबई : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ (ladki bahin scheme) योजनेतून महिलांना आर्थिक स्वावलंबनाची मोठी संधी मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून आता महिलांना थेट शून्य टक्के व्याजदराने 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. विशेष म्हणजे, हा कर्जपुरवठा मुंबई बँक करत असून महिला 5 ते 10 जणींनी एकत्र येऊन लघुउद्योग सुरू करू शकतात.

Dear sisters will get a loan of up to 1 lakh

मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये राज्यातील चार महामंडळांनी मिळून व्याजाची परतफेड करण्याचे ठरवले आहे. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, पर्यटन महामंडळाची ‘आई’ योजना, भटक्या-विमुक्त महामंडळ आणि ओबीसी महामंडळ, त्यामुळे लाभार्थी महिलांना प्रत्यक्षात कर्जावर कोणतेही व्याज भरावे लागणार नाही.

मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, कर्जासाठी अर्ज केल्यानंतर संबंधित व्यवसायाची तपासणी केली जाईल. त्यानंतर 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर होईल. सध्या मुंबई बँकेकडे 1 लाखांहून अधिक महिला सभासद आहेत, तर लाडकी बहीण योजनेत 12-13 लाख महिला सहभागी आहेत. या सर्व महिलांना आता शून्य व्याजदराचा लाभ मिळणार आहे.

दरेकरांनी हेही स्पष्ट केले की, व्याजाची भरपाई मुंबई बँक शासनाच्या संबंधित महामंडळांकडून मिळवणार आहे. स्वयंपूर्ण विकासासाठी ही योजना टप्प्याटप्प्याने राज्यभर राबवली जाणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
News Politics
MAHASATTA