Share

“मी आदेश दिला!”, फडणवीस थेट मैदानात, आळंदीतल्या कत्तलखान्यावर मोठा निर्णय

Devendra Fadnavis cancels slaughterhouse plan near Alandi, ensuring no such facility will be allowed there.

Published On: 

"I gave the order!", Fadnavis directly to the field, big decision on the slaughterhouse in Alandi

🕒 1 min read

Devendra Fadnavis : पिंपरी-चिंचवड हद्दीतल्या आळंदी (Alandi) शहराजवळ विकास आराखड्यात कत्तलखाण्यासाठी आरक्षण ठेवण्यात आल्याने संतापाची लाट उसळली होती. वारकरी संप्रदाय आणि स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “विकास आराखड्यात आळंदीसाठी कत्तलखाण्याचं आरक्षण दाखवलं गेलं आहे. पण मी स्वतः आदेश दिले आहेत की हे आरक्षण तात्काळ रद्द करण्यात यावं. कोणत्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना होऊ देणार नाही.”

Big decision on the slaughterhouse in Alandi

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “वारकरी संप्रदायाला मी विश्वास देतो – आळंदी ही एक पवित्र जागा आहे. अशा ठिकाणी कत्तलखाना होऊ शकत नाही आणि होणारही नाही.”

धरणांच्या विसर्गावर सरकारचं बारीक लक्ष

राज्यात पडलेल्या पावसामुळे अनेक धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. काही धरणांतून विसर्ग सुरू आहे. या स्थितीवर बोलताना फडणवीस म्हणाले, “धरणांच्या विसर्गासंदर्भात सरकारने संपूर्ण नियोजन केले आहे. कधी विसर्ग सुरू करायचा आणि कधी थांबवायचा, याचा अभ्यास करून निर्णय घेतले जात आहेत.”

त्यांनी स्पष्ट केलं की, राज्य सरकार शेजारच्या राज्यांशी समन्वय साधत आहे. त्यासाठी एक इंजिनिअर तिथेच स्थायिक आहे, जो संपूर्ण पावसाळ्यात समन्वय साधतो.

पुणे विद्यापीठाच्या यशावर मुख्यमंत्री खूश

पुणे विद्यापीठाने नुकताच आंतरराष्ट्रीय यादीत उडी मारली असून, जगभरातील पहिल्या 600 विद्यापीठांमध्ये स्थान मिळवलं आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त करत विद्यापीठ प्रशासनाचं अभिनंदन केलं. “माझी अपेक्षा आहे की येत्या वर्ष-दोन वर्षांत आपली विद्यापीठं पहिल्या 500 मध्ये झळकतील,” असंही त्यांनी सांगितलं.

त्याचबरोबर विद्यापीठांमध्ये रिक्त असलेल्या जागा लवकरच भरल्या जातील, अशी माहितीही त्यांनी दिली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
News Politics
MAHASATTA

🕘 संबंधित बातम्या