🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून ठाकरे (Thackeray) बंधू पुन्हा एकदा एकत्र येताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या 5 जुलै रोजी मुंबईत हिंदी सक्तीविरोधात एकत्र मोर्चा काढणार आहेत.
खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शुक्रवारी सकाळी यासंदर्भात सोशल मीडियावर माहिती देताना थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केलं. “ठाकरे म्हणजे ब्रँड आहे,” असं म्हणत त्यांनी ‘जय महाराष्ट्र’चा नारा दिला.
“Thackeray is a brand!” Raut lashes out at Amit Shah, tags him
यानंतर भाजपकडून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. भाजप आमदार आशिष शेलार म्हणाले, “मोर्चा काढणं हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, मराठी माणसासमोर भाजपची भूमिका स्पष्ट आहे. मराठी सक्ती राज्यात आहेच, हिंदी ऐच्छिक आहे.” त्यांनी हेही सांगितलं की, केंद्राच्या पाठिंब्यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.
संजय राऊतांनी अॅड. गुणरत्न सदावर्तेंवर टीका करत त्यांना “फडणवीसांचा पाळीव पोपट” म्हणलं होतं. यावर शेलार म्हणाले, “मी सदावर्तेंवर प्रतिक्रिया देणार नाही. प्रत्येकाला लोकशाहीत आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. पोलीस काय निर्णय घेतात ते पाहावं लागेल.”
शेलारांनी आणखी एक मुद्दा अधोरेखित केला – हिंदी सक्तीचा प्रस्ताव हा 2022 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच पुढे आला होता. तिथेच त्रिभाषा धोरण लागू करण्यात आलं होतं आणि त्यावेळी काँग्रेसच्या निर्णयाला राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी पाठिंबाही दिला होता, असं त्यांनी स्पष्ट केलं.
📌 महत्वाच्या बातम्या
- “याला मराठी माणूस जाम चोपेल!”, गुणरत्न सदावर्तेवर मनसेचा घणाघात
- लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! लाडक्या बहिणींना मिळणार 1 लाखांपर्यंत कर्ज, तेही शून्य टक्के व्याजदराने
- “मी आदेश दिला!”, फडणवीस थेट मैदानात, आळंदीतल्या कत्तलखान्यावर मोठा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








